शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

रोगराई पसरणार नाही याची खबरदारी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:24 IST

कोल्हापूर : पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा, पुराच्या पाण्याने अनेक ...

कोल्हापूर : पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा, पुराच्या पाण्याने अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत, तेथील दुरुस्ती तातडीने हाती घ्या, पाणीपुरवठा लवकर सुरू करा, अशा सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी महापालिका प्रशासनास दिल्या.

महापुरामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि नुकसानीबाबत आमदार जाधव यांनी महानगरपालिकेची आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होत्या.

शहरातील ज्या भागात पुराचे पाणी होते, त्या भागात साथरोग पसरू नये म्हणून काळजी घेण्यासाठी त्वरित स्वच्छता करून घ्या. कीटकनाशक औषधांची व धुराची फवारणी करून घ्या, अशा सूचना आमदार जाधव यांनी दिल्या.

पुराचे पाणी ओसरेल तशी स्वच्छता सुरू असून, अनेक भागांतील स्वच्छता व औषध फवारणी झाल्याची माहिती मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांनी दिली.

पुराचा फटका बसलेले सर्वच नागरिक, व्यापारी, व्यावसायिकांची माहिती एकत्र करा. नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण करावेत आणि भरपाई व मदतीचे प्रस्ताव तयार करून त्यांना राज्य आणि केंद्राच्या कोणकोणत्या योजनांमधून सवलत देता येईल, मदत करता येईल त्याबाबतचे प्रस्ताव तयार करण्याची सूचना आमदार जाधव यांनी दिली.

अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, उपायुक्त रविकांत आडसुळे, शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त विनायक औंधकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, नारायण भोसले, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, हर्षजित घाटगे, बाबूराव दबडे, अरुण गवळी, आदी उपस्थित होते.

नागदेववाडी उपसा केंद्र आज सुरू होणार

नागदेववाडी जल उपसा केंद्र आजपर्यंत तर सोमवारपर्यंत शिंगणापूर जल उपसा केंद्र सुरू होईल. त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती प्रशासक डॉ. बलकवडे यांनी दिली.

फोटो क्रमांक - ३००७२०२१-कोल-केएमसी मीटिंग

ओळ - कोल्हापूर महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत शुक्रवारी आमदार चंद्रकांत जाधव यांनी शहरातील स्वच्छता मोहीम, पाणीपुरवठा यांचा आढावा घेतला. यावेळी प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.