शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने एकही मृत्यू होणार नाही याची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 19:41 IST

CoronaVirus Kolhapur : लसीकरणात कोल्हापूर जिल्हा संपूर्ण राज्यात आघाडीवर आहे, कोरोनामुक्तीतदेखील जिल्हा अग्रेसर रहावा यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा, कोरोनाने एकही मृत्यू होणार नाही यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी केले. ग्रामपंचायतीने सादर केलेल्या आराखड्यातील एकूण रकमेपैकी २५ टक्के रक्कम कोरोना उपाययोजनांसाठी खर्च करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देकोरोनाने एकही मृत्यू होणार नाही याची काळजी घ्याजिल्हाधिकारी दौलत देसाई यांची ग्रामपंचायतींना सूचना

कोल्हापूर : लसीकरणात कोल्हापूर जिल्हा संपूर्ण राज्यात आघाडीवर आहे, कोरोनामुक्तीतदेखील जिल्हा अग्रेसर रहावा यासाठी सर्व ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा, कोरोनाने एकही मृत्यू होणार नाही यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी केले. ग्रामपंचायतीने सादर केलेल्या आराखड्यातील एकूण रकमेपैकी २५ टक्के रक्कम कोरोना उपाययोजनांसाठी खर्च करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यातील सर्व प्रभाग समिती, ग्रामसमिती अध्यक्ष, प्रभाग व ग्राम समित्यांचे सर्व सदस्य, सचिव, ग्रामसेवक, सरपंच यांच्याशी त्यांनी वेबिनारद्वारे संवाद साधला. यावेळी अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी यांच्यासह दूरदृश्यप्रणालीद्वारे जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, प्रशासनातर्फे प्रत्येक गावात, मनपा क्षेत्रात महा-ई-सर्व्हे सुरू करण्यात आला असून याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत. कोरोना रुग्णदर आणि मृत्यूदर कमी करण्याला प्रशासनाने प्राधान्य दिले असून या कामात नागरिकांनी उत्स्फूर्त साथ द्यावी.माणगावचे राजू मगदूम, वडणगेचे सचिन चौगुले, कवठेसादच्या दीपाली भोकरे आणि बेळगुंदीचे सरपंच तानाजी रानगे यांनी कोरोनाला गावाच्या वेशीवर थोपविण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या विविध उपायांची माहिती दिली. त्यांच्या या उपक्रमाबद्दल जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कौतुक केले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर