शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

सावधान! व्यवसाय बदलतोय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2015 00:33 IST

चकोर गांधींचे व्याख्यान : लोकमत, जैन इंटरनॅशनल, कोल्हापूर चॅप्टरतर्फे आयोजन

कोल्हापूर : ‘लोकमत’ आणि जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशन, कोल्हापूर चॅप्टर यांच्या वतीने पुण्याचे प्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ चकोर गांधी यांचे शनिवारी (दि. २९) यशवंतराव चव्हाण सभागृह, राजाराम कॉलेज येथे दुपारी चार वाजता ‘सावधान! व्यवसाय बदलतोय’ या विषयावर प्रकट व्याख्यान होणार आहे. स्पर्धेच्या युगात हमखास यशाची गुरुकिल्ली देणाऱ्या या व्याख्यानात दोन पिढ्यांनी एकत्र व्यवसाय कसा करावा, महिलांचा व्यवसायातील यशस्वी सहभाग व नवनवीन व्यवसाय, त्यातील संधी, व्यवसायातील वाढ, मनुष्यबळ व्यवस्थापन यासंबंधी विस्तृत अशी माहिती या व्याख्यानाद्वारे ते देणार आहेत. व्यवस्थापनातील प्रसिद्ध तज्ज्ञ असणाऱ्या गांधी यांचा जन्म बेळगाव (कर्नाटक) येथे झाला असून, त्यांनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन या शाखांतून शिक्षण घेतले आहे. २००३-०४ च्या ‘व्यापार भूषण’ या पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांनी उद्योग जगातील विविध पदांवर २० वर्षांहून अधिक काळ काम केले आहे. ‘कॅलिबेरेटेड फॅक्स रोल’ या उपकरणाचा पेटंट त्यांच्या नावावर नोंदविला गेला आहे. लिओ क्लब, एफ.जे.ई.एल. यासारख्या विविध संस्थांचे ते सदस्य आहेत. आजपर्यंत त्यांनी पंचवीसहून अधिक संस्थांमध्ये व्यवस्थापनातील सल्ला देण्याचे काम केले आहे. व्याख्यानात दिली जाणारी माहिती व्यापारी, उत्पादक, महिला उद्योजक, विद्यार्थी यांच्यासाठी उपयुक्त आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून, पासेस वामाज साडी सेंटर, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर, पार्श्व इन्व्हेस्टमेंट, राजीव गांधी पुतळ्याजवळ, सेंट्रल बस स्टँडशेजारी, कोल्हापूर, सॅमसंग प्लाझा, शाहू स्टेडियम, कोल्हापूर व लोकमत कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध केले आहेत.