शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बावड्याचे नेतृत्व रणरागिणींकडे

By admin | Updated: October 3, 2016 01:07 IST

सतेज पाटील : बैठकीला दहा हजार मराठा बांधव उपस्थित, शाळा-कॉलेज बंद ठेवून मोर्चात सहभागी होणार

कोल्हापूर/कसबा बावडा : मराठा समाजाच्या मागण्यांसाठी कोल्हापुरात निघणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चात सहभागी होण्यासाठी कसबा बावडा, लाईन बाजार येथील मराठा बांधव दहा रणरागिणींच्या नेतृत्वाखाली ‘भगवा चौक’ येथून निघतील. या दिवशी बावड्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवून सर्व घटकांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी रविवारी येथे केले. कसबा बावडा येथील पॅव्हेलियन मैदान येथे मराठा क्रांती मूक मोर्चाच्या नियोजनासाठी सकल मराठा बांधवांची व्यापक बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस तब्बल दहा हजार मराठी बांधवांनी उपस्थिती दर्शविली. यात महिलांची संख्याही लक्षणीय होती. पावसाच्या वातावरणात जराही विचलित न होता, मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवीत मराठा बांधवांनी आपली वज्रमूठ दाखविली. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंत मुळीक आदींची प्रमुख उपस्थिती होती. तत्पूर्वी, कसबा बावड्याच्या मुख्य रस्त्यावरून मोटारसायकल रॅली काढून वातावरणनिर्मिती करण्यात आली. यावेळी मराठा क्रांती मोर्चास प्रेरणादायी चित्रफीतही दाखविण्यात आली. मोहन सालपे यांनी मोर्चाची आचारसंहिता वाचून दाखविली. आमदार पाटील म्हणाले, मोर्चादिवशी सकाळी बावड्यातील दहा रणरागिणी लक्ष्मी विलास पॅलेस येथील शाहू जन्मस्थळाचे दर्शन घेतील. त्यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ९ वाजता भगवा चौक येथून कसबा बावडा, लाईन बाजार येथील मराठा बांधव मोर्चासाठी बाहेर पडतील. या दिवशी बावड्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवून सर्वांनी आपल्या घरांना कुलूप लावून मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी होऊया, असे आवाहनही त्यांनी केले. समाजहिताचा संदेश कसबा बावड्याने नेहमीच दिला आहे, असे ते म्हणाले. वसंत मुळीक म्हणाले, कसबा बावड्याने मनात आणल्यास १५ लाखांचा हा मोर्चा २५ लाखांचा होईल. आमचा लढा कुठल्या जातीविरोधात नाही, तर अ‍ॅट्रॉसिटीच्या गैरवापराविरोधात आहे. यावेळी शिवानी पाटील यांनी, कोपर्डी घटनेचा निषेध करत मराठा रणरागिणी यापुढे गप्प बसणार नाहीत, तर लढणार आहेत. स्नेहल दुर्गुळे म्हणाल्या, आरक्षण नसल्याने मराठा समाजाची शिक्षणाची दारे बंद झाली आहेत. प्रणाली पार्टे म्हणाल्या, सध्या मुलगी गल्ली व घरातही सुरक्षित नाही. त्यांना लहानपणापासूनच स्वसंरक्षणाचे धडे देण्याची गरज आहे. अ‍ॅड. राजनंदिनी जाधव म्हणाल्या, मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. स्वागत किशोर पाटील यांनी केले. मानसिंग जाधव यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी) आमदार समर्थकांच्या भूमिकेत या बैठकीचे नियोजन कसबा बावडा मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी केले होते. यावेळी आमदार सतेज पाटील व आमदार राजेश क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांत समर्थकांच्या भूमिकेत बसून आपला पाठिंबा व्यक्त केला.