शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

बॉक्साईटने बुजविले खड्डे

By admin | Updated: July 26, 2014 00:35 IST

वारूळनजीकची घटना : आंदोलनाचा इशारा; ‘मानवाधिकार’ची कारवाईची मागणी

मलकापूर : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील करंजोशी ते वारूळ (ता. शाहूवाडी) रस्त्यावर खड्डे बुजविण्यासाठी बेकायदेशीरपणे गौण खनिज, बॉक्साईटचा वापर केला आहे. तरी गौण खनिजांचा दुरुपयोग करणाऱ्या ठेकेदार, अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करावी, असे निवेदन जिल्हाधिकारी राजाराम माने, खनिकर्म अधिकारी भोगे यांना आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे शाहूवाडी तालुका अध्यक्ष प्रकाश गोसावी यांनी दिले आहे. कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.निवेदनात म्हटले आहे, कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर खड्डे पडले आहेत. कायद्यानुसार बॉक्साईट गौण खनिज म्हणून राष्ट्रीय संपत्ती केंद्र सरकारने जाहीर केली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी (दि.२०) गौण खनिजांची ट्रॅक्टरने वाहतूक केली. बॉक्साईटचे रस्त्यावर ढीग मारून खड्डे भरले आहेत. खड्डे भरण्यासाठी मुरुमाचा वापर केला जातो; मात्र गौण खनिज वापरून राष्ट्रीय संपत्तीचा दुरुपयोग करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अन्यथा न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही गोसावी यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)