शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘केशवराव’चे भाडे कमी करण्यासाठी आता आरपारची लढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:41 IST

कोल्हापूर : मुंबई, पुण्याच्या धर्तीवर कायमस्वरूपी केशवराव भोसले नाट्यगृहाचे भाडे कमी करण्यासाठी आता आर-पारची लढाई करण्याचा निर्धार सोमवारी झालेल्या ...

कोल्हापूर : मुंबई, पुण्याच्या धर्तीवर कायमस्वरूपी केशवराव भोसले नाट्यगृहाचे भाडे कमी करण्यासाठी आता आर-पारची लढाई करण्याचा निर्धार सोमवारी झालेल्या नाट्यपरिषद, नाट्यसंस्था, रंगकर्मी आणि नाट्यप्रेमींच्या बैठकीत करण्यात आला. पहिल्या टप्प्यात महापालिकेचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना यासंदर्भात गुरुवारी (दि. १०) निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतरही भाडे कमी झाले नाही तर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा निर्णयही यावेळी झाला.

महापालिकेच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केशवराव भोसले नाट्यगृहाची ५० टक्के आसन क्षमतेने खुले केले आहे. नाट्यसंस्थांना हे परवडणार नाही. यासंदर्भात पुढील दिशा ठरविण्यासाठी देवल क्लबच्या भांडारकर सभागृहात ही बैठक झाली. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे कार्यवाहक गिरीश महाजन म्हणाले, आसनक्षमता निम्मी केल्यामुळे खर्च भागणार नाही. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेने कोरोनामध्ये नाट्यगृहाचे ७५ टक्के भाडे कमी केले पाहिजे. याचबरोबर कायमस्वरूपी मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि नाशिकच्या धर्तीवर भाडे कमी केले पाहिजे. नाट्यगृहामध्ये सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत. यावेळी नाट्यप्रेमींनी कोरोनामुळे सहा महिने उत्पन्न नव्हते, महापालिकेने काय केले. शासनाकडून महापालिकेने नाट्यगृह घेतले असून परवडत नसेल तर शासनाकडून त्यांनी अनुदान घ्यावे, अशा सूचनाही केल्या.

चौकट

...अन्यथा नाट्यगृहावर बहिष्कार

पालकमंत्री सतेज पाटील, प्रशासक डॉ. बलकवडे आणि नाट्यगृह व्यवस्थापकांची पुढील आठवड्यात केशवराव भोसले नाट्यगृह येथे बैठक घ्यावी. यामध्ये भाडे कमी करण्यासोबतच इतर समस्या मार्गी लावण्याबाबत निर्णय व्हावा. त्यानंतरही कार्यवाही झाली नाही तर मात्र, आंदोलन करू, असा इशारा नाट्यसंस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांनी दिला तर काही सदस्यांनी नाट्यगृहावर बहिष्कार टाकण्याच्या सूचनाही केली.

चौकट

नाट्यगृह उत्पन्नाचे साधन म्हणून पाहू नका

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी नाट्यकलेला आश्रय देण्यासाठी नाट्यगृह उभारले. हे नाट्यगृह नामशेष होण्याचा काहींचा डाव आहे. महापालिकेनेही भाडे वाढवून त्यातून फायदा कमविण्याचे पाहू नये. नाट्यगृह कोल्हापूरची सामाजिक आणि सांस्कृतिक गरज असल्याचे सुनील माने यांनी सांगितले.

फोटो : १४१२२०२० काेल नाट्यगृह बैठक

ओळी :कोल्हापुरातील कोशवराव भोसले नाट्यगृहाच्या भाडे कमी करण्यासह विविध समस्यांसंदर्भात सोमवारी देवल क्लब येथे नाट्यपरिषद, नाट्यसंस्था आणि नाट्यप्रेमींची बैठक झाली. यावेळी गिरीष महाजन, आनंद कुलकर्णी, शिवप्रसाद हिरेमठ, विद्यासागर अध्यापक उपस्थित होते.