शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

‘गोकुळ’ची लढाई १० जानेवारीपासून !

By admin | Updated: December 6, 2014 00:46 IST

मतदार प्रक्रिया लवकरच : १५ मार्चपर्यंत होणार मतदान

विश्वास पाटील- कोल्हापूर  जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संस्थेची निवडणूक प्रक्रिया नव्या वर्षात १० जानेवारीपासून सुरू होत आहे. संघाच्या सत्तारूढ गटालाही त्यासंबंधीची पूर्वमाहिती देण्यात आली असून, त्यानुसार प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा सपाटा सुरू आहे. दहा जानेवारीपासून सुमारे ५६ दिवसांचा हा कार्यक्रम असेल व त्यामुळे साधारणत: १५ मार्चपर्यंत मतदान होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्णात घडलेल्या रामायणानंतर ही निवडणूक होत असल्याने त्यामध्ये चांगलेच धूमशान होणार आहे. सध्या संघात आमदार पी. एन. पाटील व आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता आहे. माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना मानणारा एकच संचालक आहे.सहकार प्राधिकरणातर्फे सध्या ‘क’ वर्गातील १३ हजार संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ती जानेवारीअखेरीस संपते. ‘ड’ वर्गातील नऊ हजार संस्थांची निवडणूक प्रक्रिया १५ फेब्रुवारीपर्यंत संपेल असा अंदाज आहे. सध्या प्राथमिक सहकारी दूध संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत. निवडणूक नवीन मतदार यादीनुसारच घ्यावी यासाठी गगनबावडा तालुक्यातील दोन संस्था यापूर्वीच न्यायालयात गेल्या आहेत. त्याचा निकाल, नव्या सहकार कायद्यातील तरतुदी यांचा विचार करून मतदारयादीबाबत निर्णय घेतला जाणार आहे; परंतु नवीन मतदार यादी तयार करूनच निवडणूक होणार, हे निश्चित आहे.संघाच्या नियोजित मुदतीनुसार नोव्हेंबर २०१२ मध्ये नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येणे अपेक्षित होते. त्यानुसार १२ जुलैला अंतिम मतदार यादी तयार झाली. तोपर्यंत सहकार कायद्यातील घटनादुरुस्तीचा विषय पुढे आल्याने दोन-तीन महिन्यांकरिता निवडणूक कशी घेणार, अशी विचारणा खुद्द तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनीच संचालक मंडळास केली होती. त्यांचा विरोध असतानाही संघाच्या म्होरक्यांनी निवडणूक व्हावी, यासाठी त्यावेळी सरकारला अंगावर घेऊन न्यायालयापर्यंत धडक मारली; परंतु निवडणूक घेण्यात त्यांना यश आले नाही. त्यावेळी संघास निवडणूक लवकर हवी होती; कारण ती लांबली तर मतदार यादी बदलेल व ते त्यांना राजकीयदृष्ट्या अडचणीचे ठरणारे होते. मागची मतदार यादी तयार होताना राष्ट्रवादी काँग्रेस मंडलिक कारखान्याच्या निवडणुकीत व्यस्त होती; त्यामुळे त्यांनी कोणत्याच प्रक्रियेत लक्ष दिले नाही. सत्तारूढ गटाने सुमारे दीडशे मतदार वाढविले आहेत. गेल्या निवडणुकीत तेवढ्याच फरकाने सत्तारूढ पॅनल निवडून आले होते. त्यामुळे ही तीनशे मतांची गोळाबेरीज आपल्याला तारू शकते, असा होरा त्यामागे होता; परंतु त्यावर पाणी फिरले आहे.आता विधानसभेनंतर राजकीय घडामोडीही बऱ्याच उलट्यासुलट्या घडल्या आहेत. सतेज पाटील विधानसभेला पराभूत झाल्यामुळे ते कितपत जोराने या निवडणुकीत भाग घेतात, याची साशंकताच आहे. माजी आमदार पी. एन. पाटील यांच्या ताकदीवरही मर्यादा आल्या आहेत. आमदार महादेवराव महाडिक ‘गोकुळ’मध्ये पुन्हा स्ट्रॉँग बनले आहेत. त्यांच्या जोडीला सहकार खातेही आहे. माजी खासदार सदाशिवराव मंडलिक, माजी मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार विनय कोरे, सतेज पाटील यांपैकी कोण कुणाच्या बाजूला राहणार याबद्दलही उत्सुकता राहील. सहकारातील निवडणूक म्हणून पक्ष गुंडाळून ठेवूनच ती गटातटांमध्येच होणार हे नक्की.‘गोकुळ’च्या निवडणुकीची प्रक्रिया कधी सुरू होणार याची निश्चित तारीख सांगता येणार नाही; परंतु ती नजीकच्या काळात सुरू होणार, हे मात्र नक्की आहे. ही निवडणूक जुन्या की नव्या मतदार यादीनुसार घ्यावयाची याचा निर्णय निवडणूक प्राधिकरण व न्यायालयात त्यासंबंधी सुरू असलेले दावे यांचा विचार करून होईल.- दिग्विजय राठोड, विभागीय उपनिबंधक (दुग्ध) पुणे मतदार असे...ठरावधारक संस्था: ३१२०संचालक: १८ विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात घडलेल्या रामायणानंतर ही निवडणूक नव्या सहकार कायद्यातील तरतुदी यांचा विचार करून मतदारयादीबाबत निर्णय घेतला जाणार