शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 देशभरातील दिग्गजांची शेट्टींसाठी ‘बॅटिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 01:09 IST

कोल्हापूर : खासदार राजू शेट्टी यांच्यासह ‘स्वाभिमानी’च्या पीचवर पुढील आठवड्यापासून देशभरातील दिग्गज प्रचारातून जोरदार ‘बॅटिंग’ करताना दिसणार आहेत. याची ...

कोल्हापूर : खासदार राजू शेट्टी यांच्यासह ‘स्वाभिमानी’च्या पीचवर पुढील आठवड्यापासून देशभरातील दिग्गज प्रचारातून जोरदार ‘बॅटिंग’ करताना दिसणार आहेत. याची सुरुवात मंगळवार (दि. १६) पासून राज ठाकरे यांच्या जाहीर सभेने होत आहे. पाठोपाठ दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांच्यासह उत्तर भारतातील शेतकरी नेते मतदारसंघात ठाण मारून प्रचारसभा गाजविणार आहेत.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांनाही आणण्याचे नियोजन जोरात सुरू आहे. १६ ते २० एप्रिल या कालावधीत या सर्व सभा घेऊन शेवटच्या पाच दिवसांत धुरळा उडवून देण्याचे धोरण आहे.खासदार शेट्टी यांची ओळख ‘देशपातळीवरील शेतकऱ्यांचा नेता’ म्हणून झाली असल्याने त्यांच्या प्रचारासाठी देशभरातील शेतकरी नेते मतदारसंघात येत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले अखिल भारतीय किसान सभेचे नेते योगेंद्र यादव, राजेश टिकैत, रामपाल जाटही पुढील आठवड्यात मतदारसंघात येत आहेत. ते सांगली व हातकणंगले मतदारसंघांसाठी प्रचारसभा घेणार आहेत.अभिनेते जयकांत शिकरे ऊर्फ प्रकाश राज यांच्यासह प्रसिद्ध वकील व शेतकरी नेते प्रशांत भूषण हेदेखील प्रचारासाठी येत आहेत. तत्पूर्वी १६ ला राज ठाकरे यांची इचलकरंजी येथे दोन्ही मतदारसंघांसाठी एकत्रित जाहीर सभा होणार आहे. यानिमित्ताने राज ठाकरे पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या व्यासपीठावर दिसणार आहेत. यांच्या जोडीला राज्यातील नेतेही सहभागी होत आहेत.त्यात खासदार उदयनराजे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याही सभा होणार आहेत.पेठवडगावमध्ये उद्या शरद पवारांची सभाउद्या, शुक्रवारी सायंकाळी पेठवडगावमध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची जाहीर सभा होत आहे. आतापर्यंत शेट्टी यांच्यावर टीका करणारे पवार यावेळी शेट्टींसाठी मते मागणार असल्याने पहिल्याच जाहीर सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गांधी कुटुंबीयांना सभेला आणण्यासाठी नियोजन सुरू आहे. मतदारसंघात प्रियंका अथवा राहुल गांधी यांची सभा होणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक