शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

शंभर वृक्षलागवडीचा संकल्प पूर्ण करतेय ‘आधार’

By admin | Updated: May 14, 2017 01:05 IST

पाटण येथील ‘आधार’ संस्थेच्या सदस्यांनी जगविली झाडे : सत्तर वर्षीय आजोबांसह तरुण सदस्यही सहभागी

प्रवीण जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : शासनाने मोठी जाहिरातबाजी करून संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी दोन कोटी वृक्षलागवड करण्याचा संकल्प केला. पंरतु झाडे लावली म्हणजे संकल्प पूर्ण होतोय असे दिसत नाही. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी सातत्य असावे लागते ते सातत्य मार्चपासून आजपर्यंत पाटणमधील ‘आधार’ सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी राखले आहे. या संस्थेच्या तीस ते चाळीस सदस्यांनी दर रविवारी हातात बादली, घागर घेऊन सकाळी सात ते नऊ यावेळेत शंभर रोपांना पाणी देऊन ती रोपे जगवली आहेत. ही संस्था नेहमीच पाटणमध्ये आणि तालुक्यात समाजकार्यात सामाजिक बांधिलकी जपून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करत आहे. दिवसेंदिवस पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनत आहे. आपल्या पूूर्वजांनी लावलेल्या वृक्षांच्यामुळे आज आपण शुद्ध हवा घेत आहोत. आपल्या भोवतालचा निसर्ग संपत्तीचा ठेवा पूर्वजांनी आपणाला दिला आणि तो ठेवा आपण पुढच्या पिढीला देण्याच्या उद्देशानेच पाटण शहरामध्ये वीरशैव लिंगायत स्मशानभूमीत ‘आधार’ सामाजिक संस्थेने शंभर विविध जातींची रोपे लावून ती जगविण्याचा संकल्प आधार सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी केला.वातावरणात वाढलेल्या तापमानामुळे आणि कडक उन्हामुळे लावलेली झाडे सुकून जाऊ नये म्हणून आधार संस्थेचे अध्यक्ष अनिल मोहिते आणि सदस्य सोमनाथ आग्रे, सुरेश चव्हाण, सुरेश क्षीरसागर, सुरेश काणे, डॉ. साठे, स्वप्नील नेवरेकर, प्रमोद पाटेकर, लक्ष्मण पाटील, दादासाहेब जाधव, शेखर धामणकर, एकनाथ मुळे, नंदकुमार शेडगे, इक्बाल हकीम, सुनील फाटक यांच्याबरोबरच जवळपास आधार संस्थेचे पदाधिकारी आणि चाळीसहून अधिक सदस्यांनी स्मशानभूमीत श्रमदान करून लावलेल्या झाडांना पाणी घालून ती झाडे जगविण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. तर विशेष म्हणजे आधार सामाजिक संस्थचे एकनाथ मुळे यांचे वय हे ७१ असून देखील ते या तरुणांच्याबरोबर दर रविवारी पाण्याची घागर घेऊन झाडांना पाणी देण्यासाठी वेळेवर उपस्थित राहत आहेत.आमच्या ‘आधार’ संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य नेहमीच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम करत असतात. समाजातील गरजू लोकांना ‘आधार’ हात देते. याबरोबरच वातावरणातील वाढते तापमान लक्षात घेता नुसते झाड लावून आपले काम संपत नाही तर ते जगविण्याची जबाबदारी देखील आपल्या सर्वांची आहे. याच भावनेतून आम्ही संस्थेचे सदस्य काम करत आहे.- अनिल मोहिते, अध्यक्ष, आधार सामाजिक संस्था, पाटण