शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बाप्पा आले घरी; महापुरातून उभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:36 IST

ढोल-ताशांसह पारंपरिक वाद्यांचा गजर, अधूनमधून कोसळणाऱ्या पाऊसधारा... मखर, विद्युत रोषणाई, फुला-पानांनी सजलेली सुंदर आरास... आरती, खीर-मोदकांसह पंचपक्वानांचा नैवेद्य... फटाक्यांची ...

ढोल-ताशांसह पारंपरिक वाद्यांचा गजर, अधूनमधून कोसळणाऱ्या पाऊसधारा... मखर, विद्युत रोषणाई, फुला-पानांनी सजलेली सुंदर आरास... आरती, खीर-मोदकांसह पंचपक्वानांचा नैवेद्य... फटाक्यांची आतषबाजी आणि आबालवृद्धांच्या चेहºयावर ओसंडून वाहणाºया उत्साहात सोमवारी लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झाले. यानिमित्ताने महिन्याभरानंतर महापुराच्या संकटातून सावरलेल्या कोल्हापूरकरांच्या घरादाराला पुन्हा एकदा नवचैतन्य, मांगल्य, सुख-समृद्धीचे तोरण बांधले गेले.लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूरकरांचा श्रावण महापूर झेलण्यात आणि त्यातून सावरण्यात गेला; पण भाद्रपदमध्ये सहा दिवसांचा पाहुणा म्हणून आलेल्या गणपती बाप्पांनी महापुराचे मळभ दूर करत पुन्हा एकदा आपल्या भक्तांवर सुखाचा वर्षाव केला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून आरास सजविण्यात गुंतलेल्या नागरिकांची सोमवारी पहाटेपासूनच बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू झाली. सकाळी सात वाजल्यापासूनच शहरातील कुंभार गल्ल्यांमध्ये भाविकांची आपल्या आवडत्या देवाला घरी नेण्यासाठी गर्दी झाली होती. अनेक कुटुंबांनी बाप्पाला घरी नेण्याचा मान घरच्या मुलींना आणि स्त्रियांना दिला.लहान मुले व पुरुषांनी डोक्यावर फरची टोपी, झब्बा परिधान केला होता तर मुलींनी भरजरी पारंपरिक ड्रेस, महिलांनी नऊवारी, सहावारी साडी, केसात गजरा, साजश्रृंगार केला होता. वयोवृद्धांपासून ते लहानग्यांपर्यंत अवघे कुटुंब डोक्यावर ‘गणपती बाप्पा मोरया’ची पट्टी बांधून, तर कुणी फेटा घालून बाप्पांना आणण्यासाठी तयार झाले होते. त्यामुळे गंगावेस कुंभार गल्ली, शाहूपुरी कुंभार गल्ली परिसर गर्दीने फुलला होता. यावर्षी उपनगरांतही अनेक ठिकाणी गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल लावण्यात आले होते. त्यामुळे उपनगरांतील नागरिकांची त्याच ठिकाणी सोय झाली. परिणामी कुंभार गल्लीत अपवाद वगळता गर्दी आणि वाहतूक कोंडी झाली नाही.पाना-फुलांनी सजलेल्या हातगाड्या, दुचाकी, चारचाकी, बग्गी, रथ अशा विविध प्रकारच्या वाहनांसह वाद्याच्या गजरात चालत बाप्पांना नेणाऱ्यांची संख्या अधिक होती. दुपारी बारा वाजल्यानंतर मात्र गर्दी कमी झाली. अधून-मधून कोसळणाºया पावसाच्या सरी झेलत भाविकांनी गणपती बाप्पांना घरी नेले.बाप्पांचा मानमुली, महिलांनागणेशमूर्ती कुटुंबातील पुरुषांनीच आणावी, असा अलिखित नियम आपल्याकडे रूढ आहे. मात्र, गेल्या तीन-चार वर्षांत या विचारसरणीला छेद देत अनेक मुली, महिलांनी बाप्पांचे सारथ्य केले. पारंपरिक वेशभूषेत बाप्पांना स्वहस्ते घरी आणत यानिमित्ताने समानतेचा संदेशच जणू देण्यात आला.रिक्षाचालकांचीमोफत सेवाशहरातील सुमारे २५ रिक्षाचालकांनी गणेशमूर्ती घेतलेल्या भाविकांना मोफत रिक्षासेवा सोमवारी दिवसभर दिली. शहरातील विविध परिसरात त्यांनी सेवा पुरविली. भाविकांनी त्यांचे आभार मानले. या रिक्षाचालकांच्या या सेवेमुळे सामाजिक बंध दृढ झाले.