शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

साखरेची उचल थांबल्याने बँका अडकल्या दुष्टचक्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:32 IST

कोल्हापूर : साखरेला बाजारात मागणीच नसल्याने नोव्हेंबरच्या कोट्यातील ७० टक्के साखर कारखान्यांच्या गोडावूनमध्येच शिल्लक राहिली आहे. साखरेचा उठावच होत ...

कोल्हापूर : साखरेला बाजारात मागणीच नसल्याने नोव्हेंबरच्या कोट्यातील ७० टक्के साखर कारखान्यांच्या गोडावूनमध्येच शिल्लक राहिली आहे. साखरेचा उठावच होत नसल्याने कारखानदारांबरोबरच बँकाही अडचणीत आल्या आहेत. साखर विक्रीतून कारखान्यांकडून येणारे कर्जाचे हप्ते थांबल्याने बँका दुष्टचक्रात अडकल्या आहेत.केंद्र सरकारने साखरेचा किमान दर २९ रुपये केल्याने यंदा साखर उद्योगासमोरील अडचणी कमी होतील, असे वाटत होते. सरकारने साखरेचा दर बांधून दिला, पण त्याबरोबर साखर कारखान्यांना कोटा पद्धत दिली. त्यामुळे प्रत्येक महिन्याला कोट्याप्रमाणेच साखर विक्री करावी लागत आहे. दिवाळीनंतर साखरेचे मार्केट काहीसे थंड पडते आणि हळूहळू पूर्वपदावर येते; पण यंदा मार्केटमधील परिस्थिती वेगळी दिसत आहे. दिवाळी होऊन दहा-बारा दिवस झाले तरी मार्केट शांतच आहे. नोव्हेंबर महिन्यातील २0 दिवस संपले तरी कोट्यातील ७० टक्के साखर कारखान्यांच्या गोडावूनमध्ये पडून आहे. बाजारात साखरेला मागणी नसल्याने उठाव होत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.गत हंगामातील साखर पोत्यावर जिल्हा बँक, राज्य बॅँकेने कर्ज दिलेले आहे. बँकिंग धोरणानुसार साखर मूल्यांकनाच्या ८५ टक्के कर्ज द्यायचे असले तरी एफआरपी देण्यासाठी काही कारखान्यांना ९० टक्के कर्ज पुरवठा केलेला आहे. मुळात कोटा पद्धत आणि त्यात तेवढ्या साखरेलाही उठाव नसल्याने बँकांकडे परतावा आलेला नाही.सध्या बाजारात २९३० रुपये प्रतिक्ंिवटल दर असला तरी त्या दरानेही कोणी घेईना, अशी परिस्थिती आहे. साखरेची उचल थांबल्याने कारखानदार अडचणीत आले असले तरी बँकाही अधिक दुष्टचक्रात सापडल्या आहेत. वसुलीच होत नसल्याने गाडा पुढे चालवायचा कसा? असा पेच बँकांसमोर आहे.कमी दराने विक्रीची शक्यताकोटा पद्धतीने साखर बाजारात येत असतानाही उठाव व्हायला पाहिजे; पण उठाव होत नाही याचा अर्थ व्यापाºयांना कमी दरात दुसरीकडे साखर उपलब्ध होत असावी असा निघू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.