शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बँकांच्या अधिकाऱ्यांची चौकशी

By admin | Updated: March 18, 2016 00:51 IST

अमोल पवार प्रकरण : सातजणांचा समावेश; मृताचा मोबाईल सापडला

कोल्हापूर : बांधकाम व्यावसायिक अमोल पवार याला अर्थपुरवठा करणाऱ्या कोल्हापूर शहरातील सात बँकेच्या अधिकाऱ्यांची गुरुवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कसून चौकशी केली. दरम्यान, मृत रमेश नायक (रा. गडहिंग्लज) याचा गारगोटी-उत्तूर पाल घाटात सापडला. पोलिसांनी संशयित अमोल पवार व त्याचा भाऊ विनायक या दोघांना घाटात तपासासाठी दुपारी नेले होते. आज, शुक्रवारी पवार याला अर्थपुरवठा करणाऱ्या काही बँकेच्या अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावणार असल्याचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी पत्रकारांना सांगितले.गेल्या आठवड्यात गडहिंग्लज येथील रमेश नाईक याचा आजरा-आंबोली या मार्गावर कार पेटवून खून केल्याप्रकरणी संशयित अमोल पवार व त्याचा भाऊ विनायक (रा. सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर) या दोघांना पोलिसांनी अटक केली. गुरुवारी (दि. १७) बालगोपाल तालीमजवळील युथ बँक शाखा, व्हीनस कॉर्नर येथील सुंदरलालजी सावजी बँक शाखा, राजारामपुरी येथील डोंबिवली नागरी सहकारी को-आॅप बँक शाखा आणि बागल चौकातील वीरशैव को-आॅप बँकेची शाखा, लक्ष्मीपुरीतील श्रीराम फायनान्सची शाखा, लक्ष्मीपुरीतील विश्वेश्वर को-आॅप बँक शाखा व मंगळवार पेठेतील अ‍ॅक्सिस बँकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी अमोल पवारच्या कर्जाबाबत माहिती घेतली तसेच एच.डी.एफ.सी.लाईफ इन्शुरन्स या कंपनीतील अधिकाऱ्यांना चौकशीकामी बोलावण्यात आले असून, त्यांच्याकडे चौकशीचे काम सुरू आहे. त्यातील काही बँक अधिकाऱ्यांना पुन्हा आज, शुक्रवारी चौकशीसाठी बोलावणार आहेत.मृत रमेश नाईक याचा मोबाईल गारगोटी पाल घाटात पवार बंधूंनी फेकून दिला होता. गुरुवारी संशयितांना पोलिसांनी घाटात फिरविले. त्यावेळी पवार बंधूंनी गडहिंग्लजमधून रमेश नायक याला उत्तूरमार्गे आजरा-आंबोलीमार्गे नेताना कारमधून नाईक याचा मोबाईल घाटात फेकल्याची कबुली यावेळी पोलिसांना दिली. त्याच्या मोबाईलची शोधाशोध घाटात केली असता मोबाईल सापडला. त्याचबरोबर पेट्रोल पंपावर अमोल पवार याने गुन्ह्णाच्यावेळी पेट्रोल भरले होते तेथील कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांचीही चौकशी करण्यात आली आहे. आता होणार नगरसेवकांची चौकशी...अमोल पवारला अर्थपुरवठा करणाऱ्या बँकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. आता त्यानंतर पवारला अर्थपुरवठा करणाऱ्या काही नगरसेवकांची पुढील दोन दिवसांत चौकशी सुरू करणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.