शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

मुरगूडच्या रूग्णालयासाठी बंदचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2016 00:39 IST

कृती समितीची स्थापना : रूग्णालय ५० बेडचे करण्याची मागणी; दोन दिवसांत वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक

मुरगूड : मुरगूड (ता. कागल) येथील ग्रामीण रूग्णालय ५० बेडचे करण्याबाबत आज कृती समितीची स्थापना करण्यात आली असून, जर वरिष्ठ पातळीवर सकारात्मक निर्णय झाला नाही तर २५ मार्चला मुरगूड शहर बंद करण्याचा इशारा या कृती समितीने दिला आहे. दोन दिवसांत वैद्यकीय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मुरगूडमध्ये कृती समितीची बैठक होणार असून, लोकमतमधून आलेल्या बातमीमुळेच सदरचा प्रश्न तडीस जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने रूग्णालय आवारात झालेल्या बैठकीत अनेकांनी ‘लोकमत’चे आभार मानले.१५ मार्चच्या लोकमतमध्ये मुरगूडचे ग्रामीण रूग्णालय ५० बेडचे व्हावे या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. या पार्श्वभूमीवर बातमीची दखल घेऊन मुरगूड नगरपरिषदेच्या विशेष सभेमध्ये याबाबतचा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. याशिवाय समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक दलितमित्र डी. डी. चौगले, बबन बारदेस्कर यांनी रूग्णालय अधिकाऱ्यांबाबत चर्चा करून आंदोलनाचा इशारा दिला. याबाबतही लोकमतमधून सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. यामुळेच आज शहरातील शंभरहून अधिक नागरिकांनी रूग्णालयात जावून वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोरच याबाबत चर्चा केली.यावेळी झालेल्या चर्चेमध्ये या रूग्णालयात ३० बेडवरून ५० बेडमध्ये रुपांतरीत करणे अत्यावश्यक असल्याचे मुरगूडचे माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी सांगितले. यासाठी निवेदन, आंदोलन आदी मार्गाचा वापर करणे किंवा वरिष्ठांबरोबर चर्चा करणे यासाठी कृती समितीची आवश्यकता असल्याने सर्वानुमते कृती समितीची स्थापना केली. यामध्ये दलितमित्र डी. डी. चौगले, दगडू शेणवी, विरोधी पक्षनेता किरण गवाणकर, व्यापारी किशोर पोतदार, समाजवादीचे अध्यक्ष बबन बारदेस्कर, प्रदीपक वर्णे, सिकंदर जमादार, राजू चव्हाण व समाधान पोवार यांचा समावेश केला आहे.या समितीमार्फतच डी. डी. चौगले व दगडू शेणवी यांनी आरोग्य सेवा मंडळ कोल्हापूरचे उपसंचालक आर. बी. मुगडे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि आपल्या मागणीबाबतची सविस्तर माहिती दिली. दरम्यान, मुगडे यांनी दोन दिवसांत याबाबत आपण मुरगूडमध्ये येऊन कृती समितीबरोबरच चर्चा करू आणि ५० बेडबाबत सकारात्मक प्रयत्न करू असे आश्वासन दिले. पण चर्चेमधून काहीच निर्णय झाला नाही तर मात्र २५ मार्च दिवशी मुरगूड बंद ठेवण्याचा इशाराही कृती समितीने दिला. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल माळवदे व डॉ. अमोल पाटील यांना नागरिकांनी दिले. यावेळी डॉ. माळवदे यांनीही आपण तत्काळ आपल्या भावना वरिष्ठांना कळवितो, असे अभिवचन दिले.यावेळी रूग्णालयामध्ये दलितमित्र डी. डी. चौगले, उपनगराध्यक्ष दगडू शेणवी, बबन बारदेस्कर, किरण गवाणकर, किशोर पोतदार, जयवंत हावळ, भिकाजी कांबळे, चाचा जमादार, गणेश तोडकर, समाधान पोवार, रोहित मोरबाळे, सुहास भारमल, दिग्वीजय चव्हाण, ऋषीकेश भारमल, राजू चव्हाण, पी. एस. दरेकर, बाळू कांबळे, रोटरी अध्यक्ष बी. एस. खामकर, पांडुरंग चव्हाण, यांच्यासह नागरिक उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी नसल्याने रोषसकाळी ९च्या सुमारास शहरातील सुमारे शंभरभर नागरिक ग्रामीण रूग्णालयामध्ये निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. सकाळी आठपासूनच तपासणीसाठी रूग्णांची मोठी रांग लागली होती. पण साडेदहापर्यंत वैद्यकीय अधिकारी आले नव्हते. त्यामुळे निवेदन देण्यासाठी गेलेले नागरिक भडकले. त्यांच्या रोषाला कर्मचाऱ्यांना सामारे जावे लागले. पण अचानक बैठक लागल्याने थोडासा वेळ झाला, असे सांगून डॉक्टरांनी वेळ मारून नेली. निवेदन, आंदोलन आदी मार्गांचा वापर करणे किंवा वरिष्ठांबरोबर चर्चा करणे यासाठी कृती समितीची आवश्यकता असल्याने कृती समितीची स्थापना