कोल्हापूर : साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर शहरातून सकाळी सहा ते रात्री आठपर्यंत ऊस वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. शहराबाहेरून पर्यायी मार्गाने वाहतूक करण्याचे आदेश शनिवारी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी काढले आहेत.
जिल्ह्यामध्ये साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. साखर कारखान्यांना जिल्ह्यातून व इतर ठिकाणांहून ट्रक, ट्रॅक्टर-ट्रॉली, बैलगाड्या, आदी वाहनांच्या मदतीने ऊस वाहतूक सुरू आहे. कोल्हापूर शहरातील वाहनांची रहदारी पाहता वाहतूक सुरक्षित व नियंत्रित राहणे आवश्यक आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आदेश पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी दिले आहेत. याची अंमलबजावणी गळीत हंगाम संपेपर्यंत लागू राहणार आहे.
चौकट
राजाराम कारखान्याकडे पर्यायी मार्ग
तावडे हॉटेलकडून ताराराणी पुतळा उजवीकडे वळण, सदर बाजार,धैर्यप्रसाद हॉल चौक, पोलीस अधीक्षक कार्यालय, कसबा बावडा मेन रोड मार्गे राजाराम साखर कारखाना.
बालिंगाकडून फुलेवाडी, रंकाळा टॉवर, रंकाळा स्टँड, गंगावेश, सीपीआर सिग्नल चौक, महावीर कॉलेज, कसबा बावडा मेन रोड मार्गे कारखाना.
भोगावती व कळंब्याकडून पुईखडी, नवीन वाशी नाका उजवे वळण, रिंगरोड, कळंबा संभाजीनगर, रिंगरोड, सायबर चौक, हायवे कॅटिन, उड्डाण पूल, ताराराणी पुतळा, सदरबाजार, धैर्यप्रयाद हॉल, पोलीस अधीक्षक कार्यालय, कसबा बावडा मार्गे कारखाना.
डी. वाय. पाटील कारखाना, कुडित्रे कारखान्याकडील पर्यायी मार्ग
तावडे हॉटेलकडून ताराराणी पुतळा उजवीकडे वळण, सदर बाजार, धैर्यप्रसाद हॉल, हेडपोस्ट ऑफिस, महावीर कॉलेज, सी.पी.आर सिग्नल उजवे वळण, शिवाजी पूल चौक डावे वळण, गंगावेश उजवे वळण, रंकाळा स्टॅन्ड, रंकाळा टॉवर, फुलेवाडीमार्गे साखर कारखाना.
बिद्री कारखान्याकडील पर्याय मार्ग
तावडे हॉटेलकडून ताराराणी पुतळा डावे वळण, उड्डाण पूल, हायवे कॅन्टीन चौक, सायबर चौक डावे वळण, रिंगरोड मार्गे संभाजीनगर डावे वळण, कळंबा मार्गे कारखाना
भोगावती कारखाना
तावडे हॉटेलकडून ताराराणी पुतळा, उड्डाण पूल, हायवे कॅन्टीन चौक, सायबर चौक, रिंगरोड मार्गे संभाजीनगर, कळंबा साईमंदिर उजवे वळण रिंगरोड, नवीन वाशी नाका डावे वळण मार्गे कारखाना.
दत्त दालमिया कारखाना
तावडे हॉटेलकडून महामार्गावरील शिये सर्व्हिस रोड, भुयेवाडी मार्गे कारखाना स्थळी