शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बामणीच्या युवकाचा खून पैशातून

By admin | Updated: July 25, 2016 00:37 IST

गूढ उकलले : आरोपी मच्छिंद्र वडर याला अटक; झटापटीत झाला मृत्यू

कोल्हापूर : बामणी (ता. कागल) येथील पप्पू बाळासो माने (वय १७) या युवकाच्या खून प्रकरणाचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी लावला. या प्रकरणी रविवारी पोलिसांनी मच्छिंद्र वडर (२९, रा. हुपरी, ता. हातकणंगले) याला अटक केली. उसनेवारीच्या पैशातून खून केल्याची आरोपी मच्छिंद्रने कबुली दिली आहे. पप्पू माने याच्या घरातून सात हजार रुपये व सोन्याच्या अंगठ्या घेऊन जाताना झटापटीमध्ये त्याचा गळा चिरला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याला ठार मारणे हा आपला उद्देश नव्हता, अशी कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. पप्पू माने हा दि. १९ जुलैला एकटाच घरी असताना त्याचा गळा चिरून खून करण्यात आला होता. या घटनेने बामणीसह कागल परिसर हादरून गेला होता. खून कोणी केला, कशासाठी केला, याबाबत उलट-सुलट चर्चा केली जात होती. चोरट्यांनी खून केल्याची चर्चाही पुढे आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गेली चार दिवस अहोरात्र तपास करून मारेकऱ्याचा छडा लावला. मारेकरी हा दुसरा तिसरा नसून पप्पूच्या घरी नेहमी ऊठबस करणारी जवळची व्यक्ती निघाल्याने कागल पोलिसही अवाक् झाले. असा लागला छडा मच्छिंद्र वडर याचे माने यांच्या घरी येणे-जाणे होते. त्यामुळे तो त्यादिवशी घरी आला. पप्पूच्या वडिलांनी त्याच्याकडून काही उसने पैसे घेतले होते. ते घेण्यासाठी तो घरी आला असता पप्पू एकटाच घरी होता. त्याने आई-वडील कुठे आहेत, अशी विचारणा केली असता पप्पूने वडील कामावर गेले आहेत. आई व भाऊ कोल्हापूरला दवाखान्यात गेल्याचे सांगितले. घरी कोणी नसताना मच्छिंद्र हा घरातील डबे शोधू लागला. यावेळी पप्पूने त्याला आई-बाबा घरी नाहीत, तू शोधाशोध करू नकोस, असे सांगितले. त्यावर त्याने तुझ्या बापाने माझ्याकडून उसने पैसे घेतले आहेत. मला आता पैशांची गरज आहे, असे सांगून डब्यातील सात हजार रुपये चिल्लर व सोन्याच्या अंगठ्या घेऊन तो जाऊ लागला. यावेळी पप्पूने त्याला विरोध केला असता दोघांच्यात झटापट झाली. यावेळी घरात पडलेल्या काचेच्या तुकड्याने पप्पूच्या गळ्यावर वार केला. खोलवर वार झाल्याने पप्पूचा जागीच मृत्यू झाला. अनपेक्षितपणे घडलेल्या घटनेनंतर मच्छिंद्र हा तेथून पसार झाला होता. तो कामधंदा न करता दारू व जुगार खेळत असल्याने कर्जबाजारी झाला होता.