शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

बालमनांनी अनुभवली ‘सफर विमानां’ची

By admin | Updated: January 19, 2015 00:34 IST

‘लोकमत’ बाल विकास मंचतर्फे आयोजन : पहिल्या दिवशी अलोट गर्दी ; मंगळवारपर्यंत खुले राहणार प्रदर्शन

कोल्हापूर : ‘बाबा विमान कसे आकाशात उडते हो...’, ‘विमानाला पंख का असतात?’, ‘दादा, ‘थ्री इडियट्स’मधील कॉडकॉप्टर असेच होते काय?’ असे बालमनात घोंघावणारे प्रश्न आज, रविवारी ‘लोकमत’ बाल विकास मंचने आयोजित केलेल्या ‘सफर विमानांची’ या प्रदर्शनात चुटकीसरशी सुटल्याचे चित्र होते. विमानाबाबत माहिती घेण्यासाठी पालकांसमवेत बालचमूंनी अलोट गर्दी प्रदर्शनास झाली होती. कमला कॉलेजच्या डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहात चाटे शिक्षण समूह कोल्हापूर विभागाचे संचालक प्रा. भारत खराटे व शाहू दूध मार्केटिंग व्यवस्थापक सुनील मगदूम यांच्या हस्ते आज सायंकाळी पाच वाजता प्रदर्शनाचे दिमाखात उद्घाटन झाले. याप्रसंगी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, आय.सी.सी.आय. बँकेचे प्रवीण सावंत, ‘पीबीसी’स अ‍ॅरो हबचे बाळासाहेब चित्ते व प्रणव चित्ते, ‘लोकमत’चे इव्हेंट मॅनेजर दीपक मनाठकर यांची प्रमुख उपस्थिती होती. विमानाने घिरटी घातल्याचा आवाज आल्यानंतर लहान मुले घराबाहेर, गच्चीवर मोकळ्या जागेत येऊन विमान पाहण्यासाठी आकाशाकडे नजरा लावतात. आकाशाकडे भिरभिरणारी नजर विमानाची छबी पाहण्यासाठी आतुर होते. शहरासह ग्रामीण भागात सर्रास दिसणारे हे दृश्य असते. बालमनाला विमानाबाबत पडणारे असंख्य प्रश्न घेऊनच आजच्या प्रदर्शनात बालचमू सहभागी झाला. विमानाची बारीकशी छबी मनात घेऊन आलेल्या बालकांनी जेव्हा आजच्या प्रदर्शनात हुबेहूब विमानांची प्रतिकृती पाहिली, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. स्वप्नातील विमानांच्या हुबेहूब असणाऱ्या प्रतिकृती पाहून झालेला आनंद बालकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता. विमानाचा शोध कसा लागला, विमान कसे उडते यापासून ते विमान कसे तयार होते याची सविस्तर माहिती बाल विकास मंचने आयोजित ‘सफ र विमानांची’ या प्रदर्शनात दिली जात आहे. तसेच वैमानिक बनण्यासाठी काय करावे, त्या क्षेत्रामध्ये करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, याबाबतही प्रदर्शनात सखोल माहिती दिली जात आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून दिवसभरात भेटी दिलेल्या हजारो कुटुंबीयांनी विमानाबाबतच्या ज्ञानात भर घातली. या ठिकाणी विविध ८० विमानांच्या प्रतिकृती व त्यांची रचना असलेले सुटे भाग मांडण्यात आले आहेत. विमानाच्या प्रत्येक घटकाबाबत शास्त्रशुद्ध माहिती ‘पीबीसी’स अ‍ॅरो हबचे डायरेक्टर प्रणव चित्ते देतात. दोन दिवस सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनाचे प्रायोजक चाटे गु्रप आॅफ एज्युकेशन, सहप्रायोजक शाहू दूध, तर सादरकर्ते ‘पीबीसी’स अ‍ॅरो हब हे आहेत. ‘सफ र विमानाची’ हे प्रदर्शनातून शोच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांमध्ये विमान अभियांत्रिकी तसेच अवकाशयान तंत्रज्ञानाबाबतीत आवड निर्माण व्हावी हा उद्देश आहे. करिअरच्या दृष्टीने योग्य वाव या प्रदर्शनातून अनेकांना मिळणार आहे.- भारत खराटे, चाटे शिक्षण समूह, कोल्हापूर विभागाचे संचालकप्रदर्शनामधून विद्यार्थ्यांना विमानांबाबत सविस्तर माहिती मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या बुद्धीला चालना मिळते. आम्हाला काहीतरी वेगळे करायचे होते. ‘लोकमत’ची ही वेगळी संकल्पना असल्याने आम्ही त्यांना सहकार्य केले आहे आणि यापुढेही त्यांच्या वेगळ्या संकल्पनेला आमचे नेहमीच सहकार्य राहील. वैमानिक क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांनीही या प्रदर्शनाचा जरूर लाभ घ्यावा. - सुनील मगदूम, शाहू दूध मार्केटिंगचे व्यवस्थापकमंगळवारपर्यंत प्रदर्शन खुले राहणारमंगळवार (दि. २०) पर्यंत हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री आठपर्यंत सर्वांसाठी पाहण्यासाठी खुले राहणार आहे. तसेच दर दोन तासांनी ‘क्वॉड कॉप्टर’चे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहे. त्याचा पालकांनी लाभ घ्यावा.