शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

सैन्यभरतीच्या आमिषाने गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:12 IST

कोल्हापूर : सैन्यदलात शिपाई भरतीचे आमिष दाखवून भरतीप्रक्रियेदरम्यान बनावट प्रश्नपत्रिका देऊन तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी शाहूवाडी येथील अफझल ...

कोल्हापूर : सैन्यदलात शिपाई भरतीचे आमिष दाखवून भरतीप्रक्रियेदरम्यान बनावट प्रश्नपत्रिका देऊन तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी शाहूवाडी येथील अफझल देवळेकरसह चौघांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात रविवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.संशयित मुख्य सूत्रधार अफझल कासम देवळेकर ऊर्फ सरकार (रा. कडवे, ता. शाहूवाडी), अरविंद लोंढे, अकिब हवालदार (रा. मलकापूर, ता. शाहूवाडी), दिलावर हवालदार (रा. टेकोली, ता. शाहूवाडी) अशी संशयितांची नावे आहेत. या रॅकेटकडून कोल्हापूर, कराड, सांगली, सातारा, पुणे, मुंबई येथील बेरोजगार तरुणांची फसवणूक करण्यात आली आहे. संशयितांना अटक झाल्यानंतर प्रकरणामागचे गुढ उकलणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे यांनी दिली.पोलिसांनी सांगितले, फिर्यादी सौरभ सुभाष कुरणे (वय १९, रा. शिवनेरी चौक, घुणकी, ता. हातकणंगले) याला नोकरीची गरज होती. त्याची संशयित अफझल देवळेकर याच्याशी ओळख झाली. त्याने ‘भारतीय सैन्य दलामध्ये शिपाई पदाची भरती सुरू आहे. तुला भरती करून घेतो; त्यासाठी तीन ते पाच लाख रुपये द्यावे लागतील’, असे सांगून विश्वास संपादन केला. तसेच कोळे (ता. कराड) येथील स्वराज्य अकॅडमीत प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून पैशाची मागणी केली. या तरुणांकडून मूळ शैक्षणिक कागदपत्रेठेवून घेतली. काम झाले की पैसे द्यावे लागतील, त्यानंतरच कागदपत्रेदेऊ , असे सांगितले.‘आर्मी’ प्रशासनाची फसवणूकसंशयित देवानंद केरबा पाटील (रा. मुदाळ, ता. भुदरगड) याने सैन्यात नोकरी मिळविण्यासाठी २७ डिसेंबर २०१९ रोजी ‘एन. सी. सी.’चे बनावट प्रमाणपत्र भरतीमध्ये सादर केले. हा प्रकार कर्नल अनुराग सक्सेना यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पाटील याला संशयित देवळेकर रॅकेटनेच बोगस प्रमाणपत्र दिल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.असा झाला उलगडाशनिवारी मध्यरात्री कोल्हापुरातील टेंबलाईवाडी येथील मिलीटरी कॅम्प परिसरात भरतीसाठी आलेल्या तरुणांना संशयित अफझल देवळेकर, अकिब हवालदार, दिलावर हवालदार यांनी भारतीय सैन्य दलाचे शिपाई पदासाठीच्या बनावट प्रश्नपत्रिका तरुणांच्या व्हॉटस् अ‍ॅपवर पाठविल्या. त्याची खात्री केल्यानंतर त्या बोगस असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार फसवणूक झालेल्या तरुणांनी थेट राजारामपुरी पोलीस ठाणे गाठले. या ठिकाणी संशयितांविरोधात फिर्याद दिली.सैन्यदलात नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक करणाºया संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी प्रश्नपत्रिका कोठे तयार केल्या. त्या आणखी किती तरुणांना देऊन फसवणूक केली आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, हे तपासात निष्पन्न होईल.नवनाथ घोगरे : पोलीस निरीक्षक, राजारामपुरी पोलीस ठाणे.