शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट महोत्सवात बालचंदर, चौगुले यांना आदरांजली

By admin | Updated: December 26, 2014 00:46 IST

प्रामुख्याने तमिळ चित्रपट उद्योगासाठी काम करणाऱ्या बालचंदर यांचे हिंदीतही अनेक चित्रपट गाजले. ‘एक दुजे के लिए’ हे त्याचे उत्तम उदाहरण होय.

कोल्हापूर : तिसऱ्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्येष्ठ दिग्दर्शक के. बालचंदर आणि बेळगाव फिल्म सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चौगुले यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, सचिव दिलीप बापट, सदस्य मनीष राजगोळकर, परीक्षक अशोक राणे, रफीक बगदादी, संस्कार देसाई उपस्थित होते. येथील शाहू स्मारक भवन परिसरात तिसरा कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे. या महोत्सवामध्ये बालचंदर आणि बेळगाव फिल्म सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चौगुले यांना आदरांजली वाहण्यात आली. आदरांजली वाहताना ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे म्हणाले, शंभराहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन बालचंदर यांनी केले. यामध्ये व्यावसायिक आणि समांतर चित्रपटांचाही समावेश होता. समांतर चित्रपटातून त्यांनी सामाजिक आशय आणि आशयघन विषयाची कास कधी सोडली नाही. प्रामुख्याने तमिळ चित्रपट उद्योगासाठी काम करणाऱ्या बालचंदर यांचे हिंदीतही अनेक चित्रपट गाजले. ‘एक दुजे के लिए’ हे त्याचे उत्तम उदाहरण होय. बालचंदर यांनी दिग्दर्शनासोबतच निर्मिती, लेखन, अभिनय, पटकथा लेखन, निवेदक याबरोबरीने विनोदी भूमिकाही पार पाडल्या. रामचंद्रन यांनी त्यांना पहिला ब्रेक दिला. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांतून रजनीकांत, कमल हसन, चिरंजीवी, जयाप्रदा, प्रकाश राज या कलाकारांना पहिली संधी दिली, अशी माहिती राणे यांनी दिली.बेळगावमध्ये १९८३ पासून फिल्म सोसायटीची स्थापना करून ती आजअखेर चालू ठेवण्याचे काम करणारे फिल्म क्लबचे कार्यकर्ते सुभाष बसाप्पा चौगुले यांनाही या महोत्सवात आदरांजली वाहण्यात आली. सुभाष चौगुले हे स्थापनेपासून बेळगावातील अजिंठा फिल्म सोसायटीचे अध्यक्ष होते. कर्नाटक चलचित्र अकादमीचेही ते सदस्य होते. त्यांच्यामुळेच बेळगावमध्ये फिल्म क्लबला चालना मिळाल्याचे कोल्हापूर चित्रपट महोत्सवाचे सचिव दिलीप बापट यांनी सांगितले. महोत्सवात काही सेकंद मौन पाळून चित्रपटगृहातील रसिकांनी बालचंदर तसेच सुभाष चौगुले यांना आदरांजली वाहली. (प्रतिनिधी)परीक्षकांचा सन्मानमहोत्सवात माय मराठी विभागात दाखविण्यात येणाऱ्या उत्कृष्ट चित्रपटांना पारितोषिक देण्यात येणार आहेत. या चित्रपटांचे परीक्षण करणाऱ्या अशोक राणे, रफीक बगदादी आणि संस्कार देसाई या तिघांचा या महोत्सवामध्ये अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.