शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बळिराजा हीच खरी बहुजन संस्कृती

By admin | Updated: October 26, 2014 00:18 IST

जे. बी. शिंदे : बळिराजा महोत्सव समितीतर्फे सन्मान पुरस्काराचे वितरण

कोल्हापूर : बहुजन नायक, महाप्रतापी व शेती संस्कृतीचा उद्गाता बळिराजा, बळिराम व सुभद्रा यांची, माणसांनी माणसासारखे कसे वागावे ही आदर्श घालून देणारी वंशपरंपरा म्हणजे देशातील बहुजनांची संस्कृती आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. जे. बी. शिंदे यांनी शुक्रवारी येथे केले.बळिराजा महोत्सव समितीतर्फे शुक्रवारी (दि. २४) बिंदू चौकात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी ‘बळिराजा संस्कृती आणि सद्य:स्थिती’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दलितमित्र व्यंकाप्पा भोसले होते.शिंदे म्हणाले, मूठभर लोभी, ऐतखाऊ लोकांनी फसवून व घातकी डाव आखून बहुजन नायकाचे राज्य हिसकावले, हा इतिहास आहे. बहुजन नायकाचा विकृत स्वरूपात खोटा इतिहास, भाकडकथा लिहिल्या तरीही अभिजनांना या बहुजन नायकाचा प्रजाहितदक्ष, स्त्रियांबद्दलचा आदराचा इतिहास लपविता आला नाही, हाच बळिराजाच्या उज्ज्वल संस्कृतीचा पुरावा आहे. म्हणूनच बळी संस्कृती ही भारतीयांची संस्कृती आहे. बळिराजाच्या वंशातील सर्वच राजांनी समतेचे, बंधुभावाचे राज्य केले; म्हणून सद्य:स्थितीत बहुजनांनी बळी संस्कृतीप्रमाणे एकत्र येणे गरजेचे आहे. दरम्यान, पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा ‘बळिराजा सन्मान’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यामध्ये सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्ते प्राचार्य डॉ. विलासराव पोवार, शिरोळ तालुक्यात अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणारे खंडेराव हेरवाडे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला कार्यकर्त्या सीमा पाटील यांचा समावेश आहे. बळिराजा पुरस्काराच्या रूपाने झालेला सन्मान म्हणजे आम्ही करीत असलेल्या समाज प्रबोधनाच्या कार्याचा गौरव आहे. यामुळे हे कार्य पुढे जोमाने करण्याची ऊर्मी मिळणार असल्याची भावना पुरस्कार मिळालेल्या मान्यवरांनी व्यक्त केल्या. जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला.डॉ. राजेंद्र कुंभार म्हणाले, प्रजाहितदक्ष राजाला फसवून, लुबाडून घात करणाऱ्यांच्या प्रतीकात्मक निषेधाला विरोध होणे हे दुर्दैवी आहे. देशभरात वामनाचे मंदिर कुठेही नाही; कारण खुन्यांना प्रतिष्ठा देणे हे भारतीय संस्कृतीत बसत नाही. व्यंकाप्पा भोसले म्हणाले, बहुजनांच्या एकतेत देशाची प्रगती व सन्मान आहे. प्रतिगाम्यांनी विरोधासाठी बहुजनांची निवड केली. राजर्षी शाहूंचे वारस सत्यशोधक असून त्यांनी कधी सत्याची वाट सोडलेली नाही. प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील म्हणाले, राजर्षी शाहूंप्रमाणे इथल्या मराठा समाजाने आपला अहंभाव सोडून देऊन बहुजन एकतेचे कार्य करावे. दिगंबर लोहार यांनी स्वागत केले. अ‍ॅड. सचिन जाधव यांनी सूत्रसंचालन केले. गौतम कांबळे यांनी आभार मानले. यावेळी गणपतराव बागडी, बाबूराव कदम, दिलीपकुमार जाधव, विकास जाधव, मोहन पाटील, राजाराम धनवडे, संभाजी जगदाळे उपस्थित होते.