शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

लाच देणाऱ्या वकिलास अटक

By admin | Updated: October 7, 2016 00:42 IST

पन्हाळ्यात कारवाई : चंदगडच्या फौजदाराने दाखविले धाडस

कोल्हापूर/पन्हाळा : अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याच्या गुन्ह्यात संशयित आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जास न्यायालयात विरोध करू नये म्हणून फौजदारास चक्क दहा हजारांची लाच देताना पन्हाळ्याच्या वकिलास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी रंगेहात पकडले. माणिक नामदेव डवंग (रा मंगळवार पेठ, पन्हाळा) असे त्याचे नाव आहे. सध्या चंदगड पोलिस ठाण्यात फौजदार म्हणून नेमणुकीस असलेल्या दिलीप बाबूराव तिबिले यांनी त्यासंबंधीची तक्रार दिली. लाच देताना अटक होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याचे या विभागातून सांगण्यात आले.याबाबत अधिक माहिती अशी, चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १४४/२०१६ अन्वये अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याचा गुन्हा (भादंविसं कलम ३६३, ३६६ व बाल लैंगिक कायदा - पोस्को कलम ४) नोंद आहे. त्यामध्ये पाच संशयित आरोपी आहेत. त्यापैकी सागर चंद्रकांत मिरजे (रा. बुधवार पेठ, पन्हाळा) यास अटक करण्यात आली आहे. या आरोपीचे वकीलपत्र माणिक डवंग यांनी घेतले आहे. ज्या चार आरोपींना अद्याप अटक झालेली नाही, त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज डवंग हे गडहिंग्लज न्यायालयात दाखल करणार आहेत. त्या अर्जास न्यायालयात विरोध करू नये म्हणून अ‍ॅड. डवंग यांनी फौजदार तिबिले यांना ५० हजार रुपयांची लाच देऊ केली; परंतु तिबिले यांना ती लाच रक्कम स्वीकारावयाची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे बुधवारी (दि. ५) तक्रार केली.शासकीय लोकसेवकास लाच देणे हा गुन्हा होतो; त्यामुळे गुरुवारी पन्हाळा येथे दोन पंचांच्या समक्ष अ‍ॅड. डवंग यांच्याविरुद्ध सापळा रचण्यात आला. डवंग यांनी तक्रारदार दिलीप तिबिले यांना पन्हाळा एस. टी. स्टॅँड येथे बोलावले. तेथील हॉटेल शिवराजसमोर तक्रारदार यांच्या गाडीमध्ये १० हजार रुपयांची लाच देऊन उर्वरित रक्कम नंतर देतो असे सांगत असतानाच त्यांना पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२ अन्वये ही कारवाई करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक उदय आफळे, सहायक फौजदार मनोहर खणगावकर, हवालदार श्रीधर सावंत, मोहन सौंदत्ती, दयानंद कडूकर, सर्जेराव पाटील यांनी या कारवाईत भाग घेतला. फौजदार तिबिले हे मुळचे शिंदेवाडीचे असून त्यांनी यापूर्वी करवीर व पन्हाळा पोलिस ठाण्यातही काम केले आहे.असे आहे मूळ प्रकरण पन्हाळ्यातील एका तरुणाचे कोवाड हे आजोळ. त्यामुळे तो नेहमी कोवाडला जात असे. त्यातून तेथील एका अल्पवयीन मुलीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले. तो कॉलेजला जातो असे सांगून २६ सप्टेंबर २०१६ ला त्या मुलीसह पळून गेला. म्हणून मुलीच्या वडिलांनी संबंधित तरुण, त्याचे आईवडील व बहीण-भाऊ अशा पाच जणांविरुध्द तक्रार दिली. त्यातील तरुणास पन्हाळा पोलिसांनी अटक केली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.जिल्ह्यातील पहिलीच घटना : लाच देणे व घेणे हा कायद्याने गुन्हा आहे, असा फलक सर्वच शासकीय कार्यालयांत लावलेला दिसतो; परंतु लाच घेताना अटकेची कारवाई ही आता सर्रास होत आहे. राज्यात रोज कुठे ना कुठे दोन तरी सरकारी कर्मचारी व अधिकारी लाच घेताना पकडले जात आहेत; परंतु लाच देणाऱ्यास अटक होण्याची कोल्हापूर जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. राज्यभरात आतापर्यंत अशा सुमारे दहा कारवाया झाल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.