शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बहुजनवादी पक्ष, संघटना काढणार प्रतिरोध मोर्चा

By admin | Updated: September 14, 2016 00:45 IST

म्हमाने यांची माहिती : ३० सप्टेंबरला मेळावा

कोल्हापूर : दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) अधिक कडक करावा, या मागणीसाठी बहुजनवादी पक्ष, संघटना आणि संस्थांतर्फे कोल्हापुरात प्रतिरोध मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याच्या तयारीसाठी दि. ३० सप्टेंबरला मेळावा घेणार असल्याचे अ‍ॅट्रॉसिटी बचाव आणि मराठा आरक्षण समर्थनार्थ कृती समितीचे निमंत्रक अनिल म्हमाने व रिपब्लिकन पक्ष (गवई गट) जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वास देशमुख यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. मराठा समाजासह धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजासही आरक्षण देण्याची मागणी या मोर्चात व मेळाव्यात केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अ‍ॅट्रॉसिटी कायदा आणि आरक्षणाबाबत बहुजनवादी पक्ष, संघटना, संस्थांची शाहू स्मारक भवनात बैठक झाली. या बैठकीतील निर्णयांची माहिती पत्रकार परिषदेत दिली. म्हमाने म्हणाले, कोपर्डीतील घटनेचा निषेध केला. कोपर्डीतील घटना आणि अ‍ॅट्रॉसिटीचा काहीही संबंध नाही, तरीही अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट रद्द करण्याची मागणी चुकीची आहे. मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही. सन १९९४ पासून आंबेडकरी चळवळीने मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे. आता सत्ता गेल्याने अस्वस्थ असलेले मराठा समाजातील काही बडे नेते गरीब मराठ्यांना घेऊन राजकारण करीत आहेत. जाती घट्ट करून दहशत निर्माण करण्याचा या नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे या दहशतवादाला उत्तर देण्यासाठी कोल्हापुरात बहुजनवादी पक्ष, संघटनांतर्फे प्रतिरोध मोर्चा काढण्यात येईल. त्याच्या तयारीसाठी ३० सप्टेंबरला दुपारी तीन वाजता दसरा चौकात बहुजनवादींचा व्यापक मेळावा होईल. प्रा. देशमुख म्हणाले, ‘मराठा आरक्षणाविरोधात हा प्रतिरोध मोर्चा नाही.’ यावेळी माजी आमदार राजीव आवळे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नंदकुमार गोंधळी, बहुजन ऐक्य चळवळीचे मच्ंिछद्र कांबळे, तसेच चंद्रकांत चौगुले, राहुल कांबळे, उमेश चांदणे, अस्मिता दिघे, अनंत मांडुकलीकर, सुनील पाटील, सुरेश सावर्डेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)