शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

बदलापूर, विटा विजयी

By admin | Updated: February 18, 2015 23:43 IST

नगराध्यक्ष सुवर्णचषक क्रीडा स्पर्धा : भद्रावती, इस्लामपूर व्हॉलिबॉलमध्ये अव्वल

विटा (जि. सांगली) : विटा नगरपरिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नगराध्यक्ष सुवर्णचषक कबड्डी स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील बदलापूर नगरपरिषद, तर खो-खो स्पर्धेत विटा नगरपरिषदेच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. यावेळी पासिंग व्हॉलिबॉल स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगरपरिषदेचा संघ, तर व्हॉलिबॉल शूटिंगमध्ये इस्लामपूर नगरपरिषदेचा संघ विजेता ठरला. या स्पर्धेतील सर्व विजेत्या संघांना माजी आ. सदाशिवराव पाटील, क्रीडा स्पर्धा समितीचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, प्रक्षप्रतोद वैभव पाटील, उपाध्यक्ष कृष्णत गायकवाड, मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याहस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.विटा येथील लोकनेते हणमंतराव पाटील क्रीडानगरीत गेल्या चार दिवसांपासून राज्यस्तरीय नगराध्यक्ष सुवर्णचषक क्रीडा स्पर्धा सुरू होत्या. आज चौथ्या दिवशी या क्रीडा स्पर्धेची सांगता आज मोठ्या उत्साहात झाली. या स्पर्धांसाठी राज्यातील ७७ नगरपरिषदांचे सुमारे १ हजार ३०० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धा वैयक्तिक व सांघिक पध्दतीने घेण्यात आल्या. या स्पर्धेच्या प्रारंभी उत्कृष्ट संचलन केल्याबद्दल बदलापूर (जि. ठाणे) नगरपरिषदेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.बुध्दिबळ स्पर्धेत इचलकरंजी पालिकेचे अजय जाधव (प्रथम), अचलपूर पालिकेचे नीलेश जाधव (द्वितीय), दारव्हा जि. यवतमाळ येथील तुकाराम साबळे (तृतीय), तर विटा नगरपरिषदेचे प्रकाश कांबळे यांना उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला. कॅरममध्ये पुरुष गटात धीरज सारवाण, प्रमोद बरसे (दोघेही काटोर नगरपरिषद, जि. नागपूर) व भरत बडदेला (अचलपूर नगरपरिषद, जि. अमरावती) यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक संपादन केला. तसेच कॅरममध्ये महिला गटात सौ. रसिका कुलकर्णी (मालवण), सौ. सुवर्णा पवार (इचलकरंजी) व पल्लवी पाटील (रत्नागिरी नगरपरिषद) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकाविले. तसेच बॅटमिंटन स्पर्धेत बी. एम. स्वामी (मालवण नगरपरिषद), संदीप तारम (तिरोरा (जि. गोंदिया) तसेच कल्याण रक्षे सातारा नगरपरिषद या खेळाडूंनी प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक संपादन केला. सहा कि. मी. चालणे स्पर्धेत प्रशांत जाधव (राजापूर), अंकुश कुडोल (बदलापूर) व मंगेश माईन (रत्नागिरी नगरपरिषद) यांनी पहिले तीन क्रमांक मिळविले, तर ५० वर्षांवरील ६ कि. मी. चालणे स्पर्धेत प्रकाश गुजर (अचलपूर), अशोक गाडे (वाई), देवीदास कुंभार (इंदापूर नगरपरिषद) यांनी प्रथम, व्दितीय, तृतीय व डॉ. दामोदर लड्डा (दारव्हा नगरपरिषद) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.या स्पर्धेत सहा कि. मी. चालणे महिला गटात सौ. पूजा करेलकर (मालवण नगरपरिषद), सौ. पल्लवी पाटील व सौ. सपस तळेकर (रत्नागिरी नगरपरिषद) या पहिल्या तीन विजेत्या ठरल्या. (वार्ताहर)पंढरपूरचा दणदणीत विजयनगराध्यक्ष सुवर्णचषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात पंढरपूर नगरपरिषदेच्या संघाने फलटण नगरपरिषदेच्या संघावर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळविला. नगराध्यक्ष सुवर्णचषक क्रिकेट स्पर्धेत पंढरपूर नगरपरिषदेचा संघ विजेता, तर फलटणचा संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत पनवेल नगरपरिषदेने तिसरा, तर विटा नगरपरिषदेच्या संघाने चौथा क्रमांक पटकाविला.आज, बुधवारी विटा येथे उपांत्य व अंतिम फेरीचे क्रिकेटचे सामने झाले. फलटण विरूध्द विटा व पंढरपूर विरूध्द पनवेल नगरपरिषद संघ असे सेमीफायनलचे सामने झाले. यावेळी फलटण संघाने विटा संघाचा २ धावांनी, तर पंढरपूर संघाने पनवेल संघाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. पंढरपूर विरूध्द फलटण संघात झालेल्या पाच षटकांच्या अंतिम सामन्यात पंढरपूर संघाने फलटण संघाचा ३ षटकात ८ गडी राखून पराभव केल्याने पंढरपूर नगरपरिषदेचा संघ विजेता ठरला. विटा नगरपरिषदेचे पक्षप्रतोद वैभव पाटील व मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याहस्ते विजेत्या संघांना गौरविण्यात आले.नगरपरिषद निहाय निकाल असे कबड्डी - बदलापूर नगरपरिषद, जि. ठाणे (प्रथम), इचलकरंजी (व्दितीय), तर काटोर, जि. नागपूर (तृतीय). व्हॉलिबॉल पासिंग - भद्रावती जि. चंद्रपूर (प्रथम), आष्टा जि. सांगली (व्दितीय), खापा जि. नागपूर (तृतीय). व्हॉलिबॉल शुटिंग - इस्लामपूर जि. सांगली (प्रथम), फलटण जि. सातारा (व्दितीय), इचलकरंजी जि. कोल्हापूर (तृतीय). खो-खो स्पर्धा - विटा अ संघ जि. सांगली (प्रथम), इचलकरंजी जि. कोल्हापूर (व्दितीय) व विटा नगरपरिषदेच्या ब संघाने तिसरा क्रमांक पटकाविला.