शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पोफळीत आईनेच केला मुलाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:49 IST

शिरगाव (चिपळूण) : संशयास्पद मृत्यू झालेल्या पोफळी येथील तरुणाला त्याच्या आईनेच मारले असल्याची खळबळजनक बाब मंगळवारी उघड झाली आहे. विक्रांत राजाराम पवार (वय २३) असे त्याचे नाव असून, पोलिसांनी त्याची आई राजश्री पवार (५२) हिला अटक केली आहे. सलग तीन वर्षे आपल्याला आणि मुलीला होणाऱ्या मारहाणीला कंटाळून आपण विक्रांतला मारहाण ...

शिरगाव (चिपळूण) : संशयास्पद मृत्यू झालेल्या पोफळी येथील तरुणाला त्याच्या आईनेच मारले असल्याची खळबळजनक बाब मंगळवारी उघड झाली आहे. विक्रांत राजाराम पवार (वय २३) असे त्याचे नाव असून, पोलिसांनी त्याची आई राजश्री पवार (५२) हिला अटक केली आहे. सलग तीन वर्षे आपल्याला आणि मुलीला होणाऱ्या मारहाणीला कंटाळून आपण विक्रांतला मारहाण केली आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याची कबुली तिने दिली आहे. चिपळूण तालुक्यातील पोफळी पवारवाडी येथे हा प्रकार घडला आहे. मुंबईत ठेकेदाराकडे काम करणारा विक्रांत गणपतीला गावात आला. सोमवारी (दि. १७) सकाळी विक्रांत पवार याचा त्याच्या घरातच मृतदेह आढळला. त्याच्या शरीरावरील खुणांमुळे त्याचा मृत्यू संशयास्पद होता. तो रविवारी (दि. १६) रात्री १२ वाजता घरी आल्याचे व आपण अपघातात जखमी झाल्याचे त्याने सांगितले, असा जवाब त्याची आई राजश्री व घरातील मंडळींनी दिला. त्याच्या डाव्या डोळ्यावर ताजी जखम व मारहाणीचे व्रण दिसत होते. त्यामुळे पोलिसांना शंका होती. मृतदेहाचे विच्छेदन सुरू असतानाच पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या सूचनेनुसार घरातील इतर माहिती पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी मिळवली. विच्छेदन अहवाल येताच त्यांचा संशय बळावला आणि विक्रांतच्या आईला ताब्यात घेतले. त्यावेळी खरा प्रकार उघड झाला.आपण काठीने व गळा दाबून विक्रांतचा खून केल्याची कबुली राजश्री पवार हिने दिली. आपल्याला व मुलगी जान्हवीला विक्रांत तीन वर्षांपासून मारहाण व शिवीगाळ करीत होता. दि. १६ रोजी रात्री दारू पिऊन आल्यानंतर त्याने राजश्री पवार हिच्या लहान नातीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राजश्री पवार हिने त्याला काठीने मारहाण केली आणि त्याचा गळा दाबला. याप्रकरणी उपनिरीक्षक गोडसे यांच्या फिर्यादीनुसार राजश्री पवार हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ २४ तासांत आरोपीला अटक झाल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.२१ पर्यंत पोलीस कोठडीमंगळवारी दुपारी राजश्री पवार हिला अटक करण्यात आली. तिला चिपळूण न्यायालयासमोर उभे करण्यात आले असता २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.