शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
4
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
5
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
6
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
7
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
8
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
9
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
10
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
11
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
12
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
13
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
14
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
15
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
16
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
17
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
18
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
19
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी
20
WhatsApp हॅक झालं? लगेच करा 'या' ५ गोष्टी; नाहीतर पूर्ण फोनचाच ताबा जाईल!

बाबूराव ठाणेकर यांना मंदिराबाहेर काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:43 IST

कोल्हापूर : अंबाबाईच्या मूर्तीला घागरा-चोली नेसविणारे श्रीपूजक बाबूराव उर्फ दत्तात्रय ठाणेकर यांना शुक्रवारी जुना राजवाडा पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव मंदिरातून बाहेर घालविले. पुजारी हटाओ प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत ठाणेकर पितापुत्रांना जिल्हा व पोलीस प्रशासनाने अंबाबाई मंदिरात प्रवेशबंदी केली होती. मात्र, त्या बंदीचे उल्लंघन करून बाबूराव ठाणेकर आपल्या वाराला मंदिराच्या गाभाºयात आले होते.

ठळक मुद्दे अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ प्रकरण : कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव पोलिसांची कारवाईसाध्या वेशातील दोन पोलिसांनी बाबूराव ठाणेकर यांना गाभाºयातून बाहेर बोलावून

कोल्हापूर : अंबाबाईच्या मूर्तीला घागरा-चोली नेसविणारे श्रीपूजक बाबूराव उर्फ दत्तात्रय ठाणेकर यांना शुक्रवारी जुना राजवाडा पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव मंदिरातून बाहेर घालविले. पुजारी हटाओ प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत ठाणेकर पितापुत्रांना जिल्हा व पोलीस प्रशासनाने अंबाबाई मंदिरात प्रवेशबंदी केली होती.

मात्र, त्या बंदीचे उल्लंघन करून बाबूराव ठाणेकर आपल्या वाराला मंदिराच्या गाभाºयात आले होते.श्रीपूजक बाबूराव ठाणेकर व अजित ठाणेकर यांनी आपल्या वारात ९ जून रोजी अंबाबाई मूर्तीला योगेश जोशी यांनी दिलेली घागरा-चोली नेसविली होती. त्या घटनेचे पर्यवसान अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ आंदोलनात झाले असून, अजूनही हे प्रकरण शांत झालेले नाही. याप्रकरणी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन शिक्षेसंबंधी निर्णय घ्यावा, अशी सूचना केली होती.

दुसºयाच दिवशी झालेल्या बैठकीत संघर्ष समितीने बाबूराव व अजित ठाणेकर या पितापुत्रांना अंबाबाई मंदिर प्रवेश बंदी करण्यात यावी, अशी मागणी केली होती.दरम्यान, श्रीपूजक बाबूराव ठाणेकर यांचा अंबाबाई पूजेचा आठवडा दर दीड ते दोन महिन्यांनी येतो. शुक्रवारपासून वार सुरू झाल्याने त्यांनी ही बंदी डावलून सकाळपासूनच अंबाबाईच्या गाभाºयात हजेरी लावली. संघर्ष समितीचे पदाधिकारी मंदिरात जाऊन बाबूराव ठाणेकर यांना मंदिराबाहेर घालविणार होते.

हा गोंधळ होऊ नये म्हणून देवस्थान समितीच्या सदस्य संगीता खाडे यांनी ही बाब जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष अविनाश सुभेदार यांना कळविली. जिल्हाधिकाºयांनी तातडीने पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना दूरध्वनी केला. पोलीस अधीक्षकांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील पोलिसांना बाबूराव ठाणेकर यांना मंदिराबाहेर घालविण्याची सूचना केली.त्यानुसार दुपारी दोन वाजता सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांच्यासह साध्या वेशातील दोन पोलिसांनी बाबूराव ठाणेकर यांना गाभाºयातून बाहेर बोलावून मंदिराच्या परिसरातून बाहेर जाण्यास सांगितले. मात्र बाबूराव ठाणेकर यांनी नकार दिला. अखेर पोलिसांनी त्यांना कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव मंदिराबाहेर पाठविले.छायाचित्रकाराशी वादया घटनेचे छायाचित्र घेण्यासाठी गेलेल्या वृत्तपत्राच्या छायाचित्रकाराला ठाणेकर यांनी ‘छायाचित्र का घेतोस?’ असे म्हणत वाद घातला व कॅमेरा काढून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटविले. दरम्यान, संघर्ष समितीने या प्रकाराचा निषेध केला.