कोल्हापूर : वडणगे (ता. करवीर) येथील बाबुराव यशवंत लोहार ( ७०)यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय वडणगे शाखेचे ते संस्थापक व वडणगेचे माजी सरपंच मुकेश लोहार यांचे वडील होत.
कांचन कांबळे
कोल्हापूर : मंगळवार पेठ, जासूद गल्लीतील कांचन आनंदराव कांबळे (७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.
रामचंद्र जाधव
कोल्हापुूर : सम्राटनगरातील रामचंद्र गणपतराव जाधव (९३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
संगीता मोळे
कोल्हापूर : घरपण (ता.पन्हाळा) येथील संगीता प्रभाकर मोळे ( ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगे, सुना, नातवंडे , दीर असा परिवार आहे. त्या प्राथमिक शिक्षक प्रभाकर मोळे यांच्या पत्नी होत.
बाबुराव पाटोळे
कोल्हापूर : कळंबा (ता. करवीर) माळवाडी येथील बाबुराव रामचंद्र पाटोळे (७५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
अरुण कारंडे
कोल्हापूर : पोवार काॅलनी, रामानंदनगरातील अरुण महादेव कारंडे (५८) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या बुधवारी आहे.
बाळू पाटील
कोल्हापूर : सिद्धनेर्ली (ता. कागल) येथील बाळू दादू पाटील (७२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. सिद्धेश्वर दूध संस्थेचे ते माजी अध्यक्ष होते.
इकबाल ढाकवाला
कोल्हापूर : ताराबाई पार्कातील इकबाल अब्दुल्ला ढाकवाला (६२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.
जिजाबाई वरपे
कोल्हापूर : कसबा बावडा संकपाळ नगरातील जिजाबाई बापूसोा वरपे ( ८५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
शालन खोत
कोल्हापूर : वाडीपीर (ता. करवीर) येथील शालन नरहरी खोत (५३) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
पद्मावती कराडे
कोल्हापूर : निगवे दुमाला (ता. करवीर) येथील पद्मावती जयकुमार कराडे (८२) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, मुलगी,नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या बुधवारी आहे.
सुभाष चव्हाण
कोल्हापूर : पांगिरे (ता. भुदरगड) येथील सुभाष रामचंद्र चव्हाण ( ६५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
श्वेतांबरी चराटकर
कोल्हापूर : तटाकडील तालीम परिसरातील श्वेतांबरी देवदत्त चराटकर (५० ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
भारती हुक्केरी
कोल्हापूर : राजारामपुरीतील भारती पांडुरंग हुक्केरी (८४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण आहे.