उपनगराध्यक्ष सौरभ पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने निवडीसाठी सभा बोलाविण्यात आली होती. निवडीनंतर माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, रमेश माळी, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, तसेच नूतन उपनगराध्यक्ष बाबासाहेब नाईक यांची भाषणे झाले. प्रवीण काळबर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर सौरभ पाटील यांनी आभार मानले. सभागृहात माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी गर्दी केली होती, तर साऊंड सिस्टीमच्या निनादात मुख्य मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये नाईक कुटुंबीय आणि तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
चौकट...
भाजपचे तीन नगरसेवक गैरहजर
उपनगराध्यक्ष पदासाठी दोन अर्ज आल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले. भाजपचे तीन सदस्य गैरहजर होते. व्हिप लागू केल्याने सध्या राष्ट्रवादी काँग्रेससमवेत असलेल्या माधवी मोरबाळे आणि मंगल गुरव यांना भाजपला मतदान करावे लागले. राष्ट्रवादी, शिवसेना, अपक्ष आघाडीचे सर्व सदस्य हजर होते. निवडणूक निर्णय अधिकारी माणिक माळी यांनी नाईक विजयी झाल्याचे घोषित केले.