शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

आजरा पोलिसांचे ‘वरून कीर्तन आतून तमाशा’

By admin | Updated: August 29, 2014 23:41 IST

‘घोलप’ प्रकरणाने नामुष्की : महसूल विभागातील लाचखोरीची पोलिसांना लागण

ज्योतीप्रसाद सावंत-  आजरा --झाडाखाली टाईमपास म्हणून रमी खेळणाऱ्यांना पकडून आणून तीन पानीच्या केसेस दाखल करण्याचे कर्तृत्व दाखविणाऱ्या आजरा पोलिसांवर पोलीस उपनिरीक्षक महादेव घोलप यांच्या लाचप्रकरणाने नामुष्की ओढवली असून ‘वरून कीर्तन आणि आतून तमाशा’चा हा प्रकार प्रामाणिक पोलिसांना मान खाली घालावयास लावणारा ठरला आहे.उच्च न्यायालयाच्या इमारतीसमोरच हाजगोळी येथील एका गुन्ह्यातील आरोपीकडून तब्बल ७५ हजार रुपयांची लाच घेताना महादेव घोलप याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. वरकरणी घोलप याच्यावर कारवाई दिसत असली तरी पडद्यामागचे सूत्रधार वेगळेच असल्याचे पोलीस खात्यामध्ये बोलले जात आहे. गेले आठवडाभर या प्रकरणाची तडजोड सुरू होती. अखेर मुंबई येथे या प्रकरणाची ठरलेली रक्कम देण्याचे ठरले. लाख रुपयांवरून ७५ हजार रुपयांना ठरलेला सौदा अखेर आजरा पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक प्रश्न निर्माण करणारा व संपूर्ण खात्याची मान खाली घालावयास लावणारा ठरला आहे.महसूल विभागातील लाचखोरीची लागण आजरा पोलीस ठाण्याला झाली आहे. तालुक्यात पोलिसांच्या आशीर्वादाने अनेक अवैध व्यवसाय सुरू आहेत, हे नाकारता येत नाही. याच पोलीस ठाण्यामधील एक तरुणफळी मात्र कर्तव्यात कसूर होणार नाही, यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे मात्र या अवैध व्यावसायिकांच्या जिवावर चिरीमिरीसाठी धडपडणारी मंडळी खात्याची प्रतिष्ठा पायदळी तुडवताना दिसतात. घोलपला अटक झाली. कारवाई होईल; परंतु ‘घोलप’ प्रकरणात नेमके कोण आहे? याचे उत्तर सापडणे गरजेचे आहे.