गडहिंग्लज : दरवर्षी गडहिंग्लजमध्ये भरणाऱ्या अखिल भारतीय युनायटेड फुटबॉल स्पर्धेतील शिस्तबद्ध संघाला वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे (विफा) ज्येष्ठ संचालक दादा आहले यांच्या नावाने पुरस्कार देण्याचा निर्णय येथील शोकसभेत घेण्यात आला.
पुसद (जि. यवतमाळ) येथील ज्येष्ठ फुटबॉल संघटक आहले यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. गडहिंग्लजसारख्या ग्रामीण भागात भरणाऱ्या फुटबॉल जत्रेचे त्यांना खूप कौतुक होते. त्यामुळे दिवाळीला गडहिंग्लजमध्ये लोकवर्गणीतून होणाऱ्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेला त्यांनी नेहमीच प्रोत्साहन दिले.
गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित शोकसभेत आहले यांना आदरांजली वाहण्यात आली. येथील एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर ही सभा झाली. अध्यक्षस्थानी 'युनायटेड'चे अध्यक्ष अरविंद बारर्देस्कर होते. दादांचे फुटबॉल प्रसाराचे प्रेरणादायी कार्य पुढे नेण्याचा निर्णय यावेळी झाला.
बारर्देस्कर म्हणाले, दादांनी फुटबॉल क्षेत्रात केलेले कार्य दीपस्तंभाप्रमाणे आहे.
खरी आदराजंली ठरेल. या हंगामातील स्पर्धा त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ घेतली जाईल.
यावेळी युनायटेडचे संचालक संभाजी शिवारे, प्रशांत दड्डीकर, महेश सुतार, उमेश देवगोंडा, सौरभ जाधव, ओंकार सुतार, ओंकार घुगरी, अनिकेत
कोले यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.
याप्रसंगी मिरजेचे फुटबॉलपटू भगवान कांबळे यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. भूपेंद्र कोळी यांनी सर्वांचे स्वागत केले. दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात आहले यांच्या कामगिरीचा आढावा घेतला. मनिष कोले यांनी आभार मानले.
-
चौकट
दरवर्षी गडहिंग्लजच्या मैदानावर हजेरी !
आहले यांनी पुसदमध्ये मैदानावर निधन झालेल्या आपल्या सहकाऱ्याच्या स्मरणार्थ सुरू केलेली अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा गेली ४५ वर्षे अखंडपणे सुरू आहे. त्यांनी 'विफा'चे उपाध्यक्ष, पुसदच्या चेतना क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, यवतमाळ जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिवपदही भूषवले. राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी ते दरवर्षी गडहिंग्लजला आवर्जून येत होते.
-
फोटो - दादा आहले यांचा फोटो वापरावा ही बातमी 'यवतमाळ'ला पाठवावी,ही विनंती.