शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

जागरुक खेळाडू नूरमहंमद देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2017 01:02 IST

नूरमहंमदने मुंबई संघावर केलेले आक्रमण धुळ्यातील प्रेक्षकांनी नावाजले

नूरमहंमद देसाई याने फुटबॉलबरोबरच हॉकी व रग्बी खेळातही आपली छाप पाडली आहे. प्रॅक्टिस या बलाढ्य संघाकडून खेळणाऱ्या नूरने महाराष्ट्र पोलिस संघाला अनेक स्पर्धांमध्ये जेतेपद मिळवून दिले आहे. मैदानावरील भांडणांपासून दूर राहणारा नूर सध्या स्थानिक संघाला मार्गदर्शन करतो.नूरमहंमद माणिकराव देसाई याचा जन्म १२ सप्टेंबर १९६१ला झाला. नूरमहंमदचे प्राथमिक शिक्षण महानगरपालिकेच्या शाळा नं. ८ मध्ये झाले. शिवाजी पेठेत वास्तव्य असल्यामुळे सभोवतालच्या फुटबॉलमय वातावरणाचा त्याला फायदा झाला. शाळा नं. ८ कडून त्याने वयाच्या दहाव्या वर्षांपासून लहान मुलांच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यावयास सुरुवात केली. त्याच शााळेतील हौशी शिक्षक धोंडिराम पाडळकर यांच्या प्रोत्साहनासह मार्गदर्शनामुळे नूरमहंमद लहान मुलांच्या फुटबॉल स्पर्र्धांमध्ये खेळू लागला. प्राथमिक शाळेच्या क्रीडांगणावर नेहमी ४ फूट ११ इंच मापाच्या स्पर्धा होत असत. या सामन्यात नूरमहंमद खेळू लागला. याकाळी तो बॅक, फॉरवर्ड व हाफ या जागांवर संघाच्या गरजेप्रमाणे खेळू लागला आणि इथेच त्याने फुटबॉलचे प्राथमिक धडे गिरविण्यास सुरुवात केली.महाराष्ट्र हायस्कूलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर वणिरे सर यांनी आपल्या शालेय संघात दाखल करून घेतले. शााळेच्या ११ खेळाडूंमध्ये त्याला स्थान मिळाले. सन १९७६ साली धुळे येथे झालेल्या राज्य शालेय फुटबॉल स्पर्धेत तो खेळला. महाराष्ट्र हायस्कूलने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. अंतिम सामन्यात त्यांचा पराभव झाला असला तरी या सामन्यातील नूरमहंमद आणि राईट आऊट भाऊ सरनाईक यांचे कॉम्बिनेशन अप्रतिम होते. नूरमहंमदने मुंबई संघावर केलेले आक्रमण धुळ्यातील प्रेक्षकांनी नावाजले. शालेय स्तरावरच नूर खेळाडू म्हणून तयार झाला. फुटबॉल खेळत असतानाच नूरमहंमदने शाळेकडे कधीच दुर्लक्ष केले नाही.नूरमहंमदने कॉमर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेथेही कॉलेजच्या संघात त्याची निवड होऊन कॉलेज स्पर्धांही गाजविल्या. डाव्या पायावरून उजव्या पायावर पळता पळता बॉल घेऊन लो-ड्राईव्ह या हार्डर घणाघाती किकच्या साहाय्याने विरुद्ध संघाचे गोलपोस्ट भेदण्याची त्याची हातोटी मस्त. कॉमर्स कॉलेजकडून खेळताना शिवाजी विद्यापीठाच्या झोन, इंटर झोन सामन्यातील उत्कृष्ट खेळामुळे वेस्ट झोनकरिता त्याची विद्यापीठ संघात निवड झाली. गोवा, झाशी, भोपाळ या ठिकाणी कधी स्टॉपर, कधी लेफ्ट आऊट, तर कधी फॉरवर्ड या जागांवर खेळून कॉलेज जीवनातील फुटबॉल खेळाचा आनंद मनमुराद उपभोगला. नूरमहंमद हॉकीही उत्तम खेळत असल्याने कॉलेजच्या हॉकी संघात वेस्ट झोनसाठी त्याची निवड झाली होती. कॉलेजमध्ये खेळत असतानाच कोल्हापुरातील बलाढ्य प्रॅक्टिस संघाने नूरमहंमदला आपल्या संघात सामावून घेतले. होणाऱ्या सर्व स्थानिक संघांमध्ये नूरमहंमदने मैदान मारलेच; पण बाहेरगावच्या सांगली, मिरज, गडहिंग्लज येथे खेळून नूरने प्रॅक्टिस क्लबची शान वाढविली. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच कोल्हापूर पोलिस संघ बाळसे धरत होता. तत्कालीन पोलिसप्रमुखांनी त्यास कोल्हापूर पोलिसमध्ये भरती करून घेतले. यामुळे त्यास कायमची नोकरी मिळाली. त्यामुळे भारतात विविध शहरात खेळावयास मिळाले. कोल्हापूर पोलिस संघाकडून खेळताना उठावदार खेळामुळे नूरमहंमद यास १९८४ ते १९९२ पर्यंत महाराष्ट्र राज्याच्या पोलिस संघात खेळण्याची दीर्घकाळ संधी मिळाली. एस. के. मुसा, भारतीय संघातील माजी खेळाडू कृष्णन यांच्या तंत्रशुद्ध मार्गदर्शनाखाली त्याने सराव केला. या संघातून त्याला जयपूर, अमरावती, कोलकाता, मुंबई येथेही कोल्हापुरी फुटबॉलचे उत्तम प्रदर्शन करता आले. त्याचबरोबर त्याने रग्बी फुटबॉल स्पर्धेतही सहभाग घेतला आहे. इंडिया साऊथ एशिया कप रग्बी स्पर्धेत त्याने चमकदार कामगिरी केली होती. सेव्हन-अ-साईड फुटबॉलमध्ये महाराष्ट्र पोलिस संघास प्रथम क्रमांक मिळवून देण्याचा नूरचा सिंंहाचा वाटा होता. एकदा पुणे येथे पोलिस संघातून खेळताना सुदान स्टुडंटस् या संघावर २० व्या मिनिटांत नूरने गोल केला व सुदानी स्टुडंटस् संघाने नूरच्या संघावर चार गोल केले. ही निराशाजनक आठवण त्यास बराच काळ सलत होती. नूरमहंमद शांत स्वभावाचा. खेळात त्याचा कधी संयम सुटला नाही. क्रीडांगणावर होणाऱ्या मारामाऱ्यापासून सदैव दूर. नूरमहंमद कोल्हापूर शहरात पोलिस खात्यात कार्यरत असून, स्थानिक संघास तो मार्गदर्शन करतो. (उद्याच्या अंकात : सूर्यकांत ऊर्फ बाबू पाटील)प्रा. डॉ. अभिजित वणिरे