शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

उदगांव-अंकली पूल मजबुतीकरणाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:42 IST

संदीप बावचे : जयसिंगपूर : दीडशे वर्षांकडे वाटचाल करणाऱ्या सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगांव-अंकली पूल मजबुतीकरणाचा प्रस्ताव कागदावरच राहिला आहे. स्ट्रक्चरल ...

संदीप बावचे : जयसिंगपूर :

दीडशे वर्षांकडे वाटचाल करणाऱ्या सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगांव-अंकली पूल मजबुतीकरणाचा प्रस्ताव कागदावरच राहिला आहे. स्ट्रक्चरल ऑडिटनंतर पूल मजबुतीकरणासाठी निधी मंजूर करण्याची मागणीदेखील युती सरकारच्या काळात करण्यात आली होती. अतिवृष्टी, महापूर, दैनंदिन होणाऱ्या वाहतुकीमुळे हा पूल धोकादायक बनला आहे. त्यामुळे या पुलाचे मजबुतीकरण तितकेच गरजेचे बनले आहे. संस्थानिक व ब्रिटिश सरकारने दोन जिल्ह्यांच्या सीमेवर हा पूल उभारुन दळणवळणाला चालना दिली होती. सांगली-कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारा उदगांव-अंकली हा कृष्णा नदीवरील १४४ वर्षे पूर्ण झालेला पूल आहे. वर्तुळ आकाराने चुन्याच्या बांधकामात भक्कम दगडाने हा पूल बांधण्यात आला होता. नवीन पूल बांधण्यात आल्यानंतर जुन्या पुलाकडे दुर्लक्ष झाले आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. कोणताही धोका पुलाला नसल्याचा अहवाल जरी देण्यात आला असला तरी या पुलाची दुरुस्ती करून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.

पाण्याखालील पिलरची पाहणी करण्याची गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर आयआयटी तज्ज्ञांच्या समितीकडून त्याची तपासणी करण्यात आली होती. सध्या पुलाची पाहणी केली असता त्याची दुरवस्था दिसून येते. त्यामुळे या पुलाचे मजबुतीकरण करण्याची मागणी होत आहे. युती सरकारच्या काळात पाण्यावरील पिलरच्या दुरुस्तीसाठी निधीचीदेखील मागणी करण्यात आली होती. तसा प्रस्तावदेखील शासनाकडे पाठविण्यात आला होता, अशी माहिती बांधकाम विभागातून देण्यात आली.

चौकट - पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न गरजेचे

पावसाळ्यात निम्म्याहून अधिक पूल पाण्याखाली जातो, तर महापुरावेळी अधिक दिवस पूल पाण्याखाली जात असतो. नदीची पाणी पातळी खालावल्यानंतर पिलरमधून पाणी पाझरु लागल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या पुलाच्या मजबुतीकरणाचा मुद्दा पुढे आला होता.

फोटो - ११०३२०२१-जेएवाय-०३-सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगांव-अंकली पुलाचे संग्रहित छायाचित्र.