शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आवाडे यांना प्रदेशाध्यक्षांचे निमंत्रण; मेळावा स्थगित

By admin | Updated: April 21, 2016 01:04 IST

संघर्षाला बुधवारी नवे वळण

इचलकरंजी : कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावरून पी. एन. पाटील आणि प्रकाश आवाडे यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाला बुधवारी नवे वळण मिळाले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आवाडे यांना येत्या शनिवारी भेटीसाठी बोलावल्याने आवाडे गटाने शनिवारी आयोजित केलेला मेळावा स्थगित केला आहे. काँगेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून पुन्हा पी. एन. पाटील यांना मुदतवाढ दिल्याने इचलकरंजीसह हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील आवाडे समर्थक कार्यकर्त्यांतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यामुळे आवाडे यांनी शनिवारी (दि. २३) कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी आमदार सतेज पाटील यांनी आवाडे यांची भेट घेत भावना जाणून घेतल्या व त्या प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहोचविल्या. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी आवाडे यांना २३ एप्रिलला भेटीसाठी बोलविले आहे. हा निरोप आल्यानंतर आवाडे यांनी काँग्रेसच्या सुकाणू समितीची बैठक घेऊन मेळावा तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कार्यकर्त्यांचे लक्ष आता मुंबई भेटीकडे लागले आहे. (वार्ताहर)कोल्हापुरात मेळावा घेणार : आवाडेमुंबई येथे शनिवारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा झाल्यानंतर स्थगित करण्यात आलेला मेळावा इचलकरंजीऐवजी कोल्हापुरात घेतला जाईल, अशी माहिती माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सायंकाळी पत्रकार बैठकीत दिली.