शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुजारी नेमणूक कायदा अंमलबजावणीस टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 00:51 IST

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात शासकीय पुजारी नेमण्याचा कायदा झाला असला तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप श्री करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीच्या वतीने रविवारी बैठकीत करण्यात आला.अंबाबाई मंदिरात शासकीय पुजारी नेमण्यासाठी राज्य सरकारने कायदा केला. मात्र, कायदा होऊन काही महिने लोटले तरी त्याची ...

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात शासकीय पुजारी नेमण्याचा कायदा झाला असला तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप श्री करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीच्या वतीने रविवारी बैठकीत करण्यात आला.अंबाबाई मंदिरात शासकीय पुजारी नेमण्यासाठी राज्य सरकारने कायदा केला. मात्र, कायदा होऊन काही महिने लोटले तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी रविवारी समितीच्या सदस्यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची भेट घेतली. याप्रसंगी पालकमंत्र्यांची वेळ घेऊन लवकरच बैठक घेऊ, असे आश्वासन जाधव यांनी आंदोलकांना दिले.यावेळी आर. के. पोवार म्हणाले, जनतेच्या रेट्यामुळे सरकारने ‘अंबाबाई मंदिर पगारी पुजारी कायदा’ केला. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी केलेली नाही. या कायद्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली जात आहे.संजय पवार म्हणाले, कायदा झाला; पण काळानुसार त्याची अंमलबजावणी झालीच नाही. पुन्हा नवरात्रौत्सव आला आहे. त्यामुळे पुजाऱ्यांना पुन्हा उत्पन्नाची संधीच मिळाली आहे. नवरात्रौत्सवापूर्वी हा कायदा लागू करता येतो का, हे समितीने पाहणे आवश्यक आहे.महेश जाधव म्हणाले, तात्पुरते पुजारी नेमण्याची प्रक्रिया सुरू केली होती; पण काहीजण न्यायालयात गेल्याने ती थांबली. नवरात्र तोंडावर असून एवढ्या कमी वेळात सर्व धार्मिक विधी करू शकतील असे पुजारी नेमणे अशक्य आहे. मात्र, शासकीय पुजारी नेमावेत, हीच आमची भूमिका आहे.या बैठकीला इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, माजी आमदार सुरेश साळोखे, दिलीप पाटील, अ‍ॅड. चारूलता चव्हाण, बाबा पार्टे, शरद तांबट, प्रताप वरुटे हे उपस्थित होते.