शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
3
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
4
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
5
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवस्त्र' पाहिलं का?
7
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
8
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
9
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
10
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
11
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
12
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
14
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
15
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
16
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
17
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
18
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
19
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
20
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...

पूरबुडीत क्षेत्राची काळजी घेऊन नुकसान टाळा

By admin | Updated: July 18, 2016 01:10 IST

ऊस संशोधन केंद्राचे शेतकऱ्यांना आवाहन

कोल्हापूर : पुराच्या पाण्याखाली गेलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी थोडीशी जागरूकता दाखविली तर नुकसान कमी होण्यास मदत होईल. यासाठी शेतकऱ्यांनी पूरबुडीत क्षेत्रातील साठलेले पाणी चरीद्वारे बाहेर काढण्यासह विविध उपाययोजना कराव्यात, असे आवाहन प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. पुरामुळे नदीकाठचे ऊसपीक दहा ते पंधरा दिवस पाण्याखाली जाते. गाळमिश्रित पाणी, चिखल बसल्याने शेंडे कुजण्याची प्रक्रिया जलद गतीने होते. ऊस शेंड्याकडून खाली वाळत जातो. पाण्यात बुडालेल्या कांड्यांना मुळे फुटतात. कोंब फुटलेला ऊस पोकळ होण्याची शक्यता जास्त असते. परिणामी, त्याचे वजन घटते. उसाचे शेंडे पाण्याच्या वर राहिले तरीही खालील पानांवर थर बसून नुकसान होते. कांडीवरील पानाच्या टोपणामध्ये गाळाची माती बसून कांड्यांना मुळे फुटतात. तसेच कांडीवरील डोळे फुगीर होऊन कोंब फुटण्यास सुरुवात होते. ऊसक्षेत्रात जास्त दिवस पाणी राहिल्याने जमिनीची सच्छिद्रता व जमिनीतील जैविक पातळी कमी होते. तसेच जमिनीमध्ये असणारी अन्नद्रव्ये वाहून जातात. अन्नद्रव्यांचे स्थिरीकरण होऊन रासायनिक सुपीकता कमी होते. पीकवाढीसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांची कमतरता भासते. त्यामुळे उसाची वाढ खुंटते; तसेच पुराच्या पाण्यामुळे उसाच्या मुळ्या अकार्यक्षम होऊन ऊस लोळण्याचे प्रमाण वाढते. यासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेतली तर नुकसान कमी करणे शक्य असल्याचे आवाहन ऊस संशोधन केंद्राचे डॉ. एस. एम. मोरे, डॉ. व्ही. एन. नाळे, डॉ. व्ही. वाय. कंकाळ व डॉ. व्ही. एम. लोंढे यांनी पत्रकातून केले आहे. (प्रतिनिधी) या करा उपाययोजना पूरबुडीत क्षेत्रातील साठलेले पाणी चरीद्वारे बाहेर काढावे. पूरबुडीत उसाला कोंब फुटण्याची शक्यता असते. अशा वेळी साखर कारखाने सुरू होईपर्यंत कोंब काढावेत. किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने एकरी सहा किलो फोरेट १० जी दाणेदार खत संरक्षक उपाय म्हणून सरीमध्ये टाकावे. उसाची कुजलेली पाने सरीत टाकून हवा खेळती करावी. ऊस जमिनीवर पडले असल्यास ते सरळ करावेत. एकरी दहा किलो झिंक सल्फेट सेंद्रिय खतामधून द्यावे.