शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दाखल्यावरील ‘जात’ कायद्याने घालवा

By admin | Updated: March 20, 2015 00:23 IST

प्रकाश आंबेडकर यांची मागणी : कोल्हापुरात जातविरोधी एल्गार परिषद

कोल्हापूर : जातिव्यवस्थेने इथल्या समाजात भिंती निर्माण केल्या. त्यामुळे जाती गाडल्या पाहिजेत. शाळेच्या दाखल्यापासून याची सुरुवात झाली पाहिजे. जातिव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या संघटनांनी जात का आवश्यक आहे, याची चर्चा आमच्यासोबत कुठेही करावी, असे आव्हान सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ व जातिमुक्ती आंदोलनाचे मुख्य निमंत्रक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिले. सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ व जातिमुक्ती आंदोलनाची एल्गार परिषद येथील मुस्लिम बोर्डिंगमध्ये गुरुवारी झाली. त्यावेळी ते बोलत होते. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, जातींनी समाजाचा विकास खुंटविला. जात हद्दपार झाली पाहिजे. आंतरजातीय दाम्पत्यांना होणाऱ्या अपत्याची जात भारतीयच असली पाहिजे, हे ठराव आम्ही नागपूर आणि लातूर येथील परिषदेत केले आहेत. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, जात आणि विशिष्ट धर्माचा आग्रह करून एकता कशी साधली जाऊ शकते, याबाबतची भूमिका बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि ‘आरएसएस’ या संघटनांनी मांडली पाहिजे. पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करावे, यासाठी ८ एप्रिलला नागपूर येथे मोर्चा काढण्यात येणार आहे.आंदोलनाचे कार्यकारी निमंत्रक भारत पाटणकर म्हणाले,जातिअंताच्या लढाईसाठी मे महिन्यापर्यंत ही प्रबोधन मोहीम चालविण्यात येणार आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून पुरोगामी कार्यकर्त्यांना धमकीची पत्रे येत आहेत. अंक पाठविण्यात येत आहेत. गोळ्या घालून विचार संपत नाहीत; पण अशा प्रवृत्तींना चोख उत्तर देईल. परिषदेत सुरुवातीला सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांना श्रद्धांजली वाहिली. किशोर ढमाले, अतुल दिघे, धनाजी गुरव, उदय नारकर, नामदेवराव गावडे, अरविंद देशमुख, डॉ. गेल आॅम्वेट यांची भाषणे झाली. यावेळी गौतमीपुत्र कांबळे, दिलीप पोवार, आदी उपस्थित होते. परिषदेतील मागण्या आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन व दाम्पत्यांना संरक्षणशाळेच्या दाखल्यावरून जात कॉलम रद्द करण्यासाठी कायदा करावा, आंतरजातीय दाम्पत्याच्या अपत्याची जात ‘भारतीय’ अशी असावी.जातिव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्यांना खुल्या चर्चेचे आव्हान