कोल्हापूर : येथील अवनी संस्थेच्या वतीने गुरुवारी (दि.१८) कचरावेचक हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या उपाध्यक्ष अनुराधा भोसले आणी वसुधा संघटनेच्या अध्यक्षा आक्काताई गोसावी यांनी ही माहिती दिली.
अवनी संस्था गेली सात वर्षे कोल्हापूर जिल्ह्यातील कचरावेचक महिलांना संघटित करण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर ही परिषद होणार आहे. सकाळी दहा वाजता तीनशेहेून अधिक कचरावेचक महिला टाऊन हॉलमध्ये एकत्र येतील. शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये परिषद होईल.
मुंबई परिसर विकास भगिनी संघाच्या अध्यक्ष सुशीला साबळे, डॉ. मंजुळा पिशवीकर, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, डॉ. सूरज पवार, डॉ. रेश्मा पवार, तनुजा शिपूरकर, डॉ.मधुकर बाचूळकर यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी कचरावेचक बचत गटांना त्यांनी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.