शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

‘एव्हीएच’ हद्दपार करणारच

By admin | Updated: March 13, 2015 23:55 IST

भरमू पाटील : कार्यकर्त्यांसह विधानसभेवर धडक मारणार

चंदगड : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) येथील औद्योगिक वसाहतीतील ‘एव्हीएच केमिकल्स’ हा प्रकल्प तालुक्यातील जनतेच्या आरोग्य व पर्यावरणासाठी घातक आहे. त्यामुळे हा प्रकल्प हद्दपार करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणार आहे. त्यासाठी हजारो कार्यकर्त्यांसह विधानसभेवर धडक मारणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील यांनी पाटणे फाटा येथे पत्रकार परिषदेत दिली. अध्यक्षस्थानी काँगे्रसचे तालुकाध्यक्ष नामदेव दळवी होते.भरमूअण्णा म्हणाले, गेल्या तीन वर्षांपासून या प्रकल्पाला आमचा विरोध आहे. या प्रकल्पाची बाजू जनतेसमोर यावी, म्हणून तत्कालीन राज्यमंत्री सतेज पाटील यांना भेटून वस्तुस्थिती सांगितली होती. त्यानुसार ९ जानेवारी २०१३ला प्रशासन, कंपनीचे अधिकारी व आंदोलक यांची संयुक्त बैठक तहसील कार्यालयात झाली होती. मात्र, आंदोलन हिंसक वळणावर गेल्याने पुढील बैठका थांबल्या. विधानसभा पोटनिवडणूक प्रचारात यशवंतनगर येथे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्र्यांनी ‘एव्हीएच’ चंदगडमधून घालवणारच, असे ठाम आश्वासन दिले होते. परंतु, कृती काहीही झाली नाही. मी कार्यकर्त्यांसह केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्लीमध्ये भेट घेऊन हा तालुक्याच्या मुळावर उठलेला प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी केली होती. यावेळी उपसभापती शांताराम पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र परीट, माजी सभापती यशवंत सोनार, सरपंच सचिन बल्लाळ, सरपंच वसंत चव्हाण, बाबूराव जाधव, पंचायत समिती सदस्य बबनराव देसाई, सदानंद चंदगडकर, गणपत नाडगौडा, आर. जी. पाटील, आदी उपस्थित होते.सर्वांनी एकत्र यावेचंदगड तालुक्यात ‘एव्हीएच’ प्रकल्प कोणी आणला, कोणत्या परिस्थितीमध्ये आणला, तो आणताना कोणकोणत्या घडामोडी घडल्या, याविषयी आता चर्चा करणे योग्य नाही. हा मुद्दाही आता महत्त्वाचा नाही. त्यापेक्षा ‘एव्हीएच’ प्रकल्प हा तालुक्याच्यादृष्टीने घातक आहे, तो हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.