शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

आंब्यापेक्षा ‘हनुमान’चे आकर्षण

By admin | Updated: December 15, 2014 00:14 IST

आठवडी बाजार : कडधान्य स्थिर; भाजीपाला, कोथिंबीर घसरली; ‘हापूस’, ‘तोतापुरी’कडे दुर्लक्ष

कोल्हापूर : कोल्हापूर फळ मार्केटमध्ये या आठवड्यात हापूस व तोतापुरी आंब्यांची आवक सुरू झाली आहे. बंगलोर येथून दररोज वीस बॉक्स आवक सुरू असली तरी या आंब्याला फारशी मागणी नसल्याने दर जेमतेमच आहेत. सोलापूर जिल्ह्यातून आलेले हनुमान फळ सगळ्यांचे लक्ष वेधत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाला घसरला असून, घाऊक बाजारात मेथीची पेंडी तीन रुपये, तर कोंथिबीर दोन रुपयांपर्यंत खाली आली आहे. कडधान्याचे दर स्थिर असले तरी शाबूदाणा व सरकी तेलाच्या दरातील घसरण अद्याप थांबलेली नाही. साधारणत: रत्नागरी, देवगड हापूसची आवक फेबु्रवारी महिन्यात सुरू होते. पण, यंदा बंगलोरमधून हापूस आंब्यांची आवक कोल्हापूर मार्केटमध्ये सुरू झाली आहे. रोज सरासरी वीस बॉक्स आंब्यांची आवक होत असली तरी रत्नागिरीची चव नसल्याने हा आंबा ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला नाही. तीच अवस्था तोतापुरी आंब्यांची आहे. साधारणत: पाचशे किलो तोतापुरीची आवक सुरू असून, ७५ रुपये किलोने त्याची विक्री सुरू आहे. सीताफळ, रामफळाची आवक गेले अनेक दिवस सुरू आहे. दरवर्षी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणारी हनुमान फळाची आवक झाली आहे. सांगोला, पंढरपूर येथून आवक होणाऱ्या या फळाचे वजन ७० ते ८० ग्रॅम असते, पिकल्यानंतर ते अधिक गोड लागत असल्याने त्याला मागणी मोठी आहे. साधारणत: १५० ते २०० रुपये डझनाचा दर आहे. संत्र्यांसह माल्टाची आवक मोठ्या प्रमाणात आहे. किरकोळ बाजारात संत्री वीस रुपये किलोपर्यंत खाली आला आहे. बोरांची आवकही वाढू लागली असून, द्राक्षांची आवक सुरू असली तरी फारच कमी आहे. गेले आठवड्याच्या तुलनेत कोबी, वांगी, टोमॅटो, ढब्बू, भेंडी, वरणाचे दर एकदम खाली आले आहेत. इतर भाज्यांचे दर स्थिर राहिले असून, कोथिंबीर, मेथीची आवक वाढल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे. सरकी तेलाच्या दरात दोन रुपयांनी घसरण झाली आहे. घाऊक बाजारात साखरेच्या दरात चढ-उतार असला तरी किरकोळ बाजारात २८ ते ३० रुपये किलोने विक्री सुरू आहे. भाज्यांचे दर (प्रतिकिलो)कोबी : ३ ते ११वांगी : ३ ते २२ टोमॅटो : ३ ते १६ ढब्बू : १५ ते ३५ गवार : २० ते ४० वाटाणा : १७ ते ३५कारली : १३ ते २५दोडका : ७ ते ४०. ‘रत्नागिरी हापूस’ जानेवारीत येणारसध्या बंगलोर हापूसची आवक सुरू असली तरी रत्नागिरी व देवगडच ग्राहकांच्या पसंतीस उतरतो. या आंब्याची वाट ग्राहक सात-आठ महिने बघत असतो. यंदा खराब हवामान असले तरी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हापूस बाजारात दाखल होईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. गूळ घसरला,कांदा स्थिरावलागेले आठवड्याच्या तुलनेत गुळाच्या दराची प्रतिक्विंटल १०० ते १५०० रुपयांनी खाली आले आहेत. प्रतिक्विंटल २८०० ते ३१९० रुपये दर झाला असून, एक किलो गुळाचा दर २५०० रुपयांपर्यंत घसरला आहे. कांदा व बटाट्याचे दर तुलनात्मक स्थिर राहिले आहेत. लक्ष्मीपुरी येथील आठवडी बाजारात ‘हनुमान’ फळ ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. पंढरपूर भागातून या फळाची आवक झाली .