शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हागणदारीमुक्तीसाठी वस्त्रनगरींवर लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2017 00:25 IST

इचलकरंजी शहराचा आढावा : स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे प्रकल्प संचालक टेकाळे यांची माहिती

इचलकरंजी : राज्यातील ९० शहरे हागणदारीमुक्त झाली असून, त्यापाठोपाठ इचलकरंजी, भिवंडी, मालेगाव या वस्त्रोद्योगांशी निगडित असलेली औद्योगिक शहरेदेखील हागणदारीमुक्त व्हावीत याकडे शासनाने लक्ष केंद्रित केले आहे. यापैकी इचलकरंजी नगरपालिकेने अन्य शहरांच्या तुलनेत हागणदारीमुक्तीसाठी चांगले काम केले असून, आतापर्यंत ९० टक्क्यांहून अधिक शहर हागणदारीमुक्त झाले आहे, अशी माहिती स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे प्रकल्प संचालक डॉ. उदय टेकाळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शुक्रवारी ते इचलकरंजी येथे आले होते. त्यांनी नगरपरिषदेकडील आरोग्य व स्वच्छता विभागाकडे सुरू असलेल्या हागणदारीमुक्त शहराचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यामध्ये नऊ लाख शौचालये बांधण्याचे शासनाचे उद्दिष्ट होते. आतापर्यंत सात लाख शौचालये उभारण्यात आली असून, उर्वरित दोन लाख शौचालये वर्षभरात बांधण्यात येणार आहेत. इचलकरंजी शहरातील हागणदारीमुक्तीचे काम अन्य औद्योगिक शहरापेक्षा अधिक प्रगतिपथावर असल्याचे सांगून ते म्हणाले, इचलकरंजीमध्ये २३८८ शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १२४५ शौचालये बांधण्यात आली आहेत. त्याचबरोबर या नगरपालिकेने उभारलेल्या पे अ‍ॅण्ड युज पद्धतीच्या सार्वजनिक शौचालयांचा नागरिक चांगल्या पद्धतीने वापर करीत आहेत, ही समाधानकारक बाब आहे. १५ फेब्रुवारीला राज्यातील ग्रामीण भागाबरोबर सर्वच शहरांचा हागणदारीमुक्तीच्या दृष्टीने आढावा घेण्यात येईल. त्यावेळी इचलकरंजी हागणदारीमुक्त झालेली असेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)पालिकांसाठी विशेष अनुदानपूर्णपणे हागणदारीमुक्त होणाऱ्या शहरांना शासनाकडून विकासासाठी संबंधित नगरपालिकांना दोन कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे, असे सांगून डॉ. टेकाळे म्हणाले, हागणदारीमुक्त झालेल्या शहरातील नगरपालिकांसाठी शासन स्तरावर मिळणाऱ्या विविध योजनेंतर्गत अनुदान देण्यासाठी अधिक लक्ष देण्यात येईल; म्हणून नगरपालिकांनी आपली शहरे हागणदारीमुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असेही आवाहन त्यांनी केले.