शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मालोजीराजेंची ‘ताकद’ कुणाला याकडे लक्ष

By admin | Updated: October 27, 2015 01:11 IST

पंचरंगी लढत : उमेदवार संख्या जास्त असल्याने मतविभागणी ठरणार महत्त्वाची--बिग फाईट

रमेश पाटील- कसबा बावडा--तब्बल १५ वर्षांनंतर सर्वसाधारण गटासाठी खुला झालेल्या व मालोजीराजे यांचे वर्चस्व असलेल्या रमणमळा प्रभागात पंचरंगी लढत होणार असून, मालोजीराजेंची ‘ताकद’ कुणाच्या पाठीमागे असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तथापि शिवसेनेच्या उमेदवारामुळे येथे चुरस रंगतदार होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. ‘रमणमळा’ प्रभागात विद्यमान नगरसेवक राजाराम गायकवाड हे ताराराणी आघाडीतर्फे रिंगणात उतरले आहेत. गेली दहा वर्षे ते नगरसेवक आहेत. प्रभाग खुला झाल्याने गायकवाड यांनी इतरांना संधी द्यायला पाहिजे होती, असा प्रचार विरोधकांकडून सुरू आहे. गायकवाडना मात्र आपण भागात केलेल्या विकासकामाच्या जोरावर सहज निवडून येऊ असा आशावाद आहे. विरोधी सर्व गटाच्या उमेदवारांनी त्यांना खिंडीत पकडण्यासाठी व्यूहरचना केली आहे. मात्र, तरीही गायकवाडांनी आपला प्रचार नेटाने सुरू ठेवला आहे. प्रचारातही त्यांची आघाडी आहे. माजी नगरसेवक आप्पासो बेडगकर हे चिरंजीव चंद्रशेखर बेडगकर यांना शिवसेनेची उमेदवारी घेऊन रिंगणात आहेत. सध्या या भागात शिवसेनेच्या उमेदवारांनी वातावरण निर्माण केले आहे. प्रभाग गेली १५ वर्षे आरक्षित होता. आता सर्वसाधारण प्रभाग झाल्याने ही संधी सोडायची नाही, असा चंग बेडगकर यांनी बांधला आहे. गल्लोगल्ली, कॉलन्या, बोळ आणि चौक पिंजून काढण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. सुशिक्षित, तरुण मतदारांचा तसेच ज्येष्ठांचा आपल्याला पाठिंबा असल्याने ही निवडणूक आपण एकतर्फी जिंकू, असा आशावाद बेडगकरांना आहे. काँग्रेसने संदीप उर्फ पप्पू सुरेश सरनाईक यांना उमेदवारी दिली आहे. सामाजिक कार्यात आघाडीवर असणाऱ्या सरनाईक यांनी प्रचारातही आघाडी घेतली आहे. संदीप सरनाईक हे माजी मंत्री सतेज पाटील गटाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे सतेज पाटील यांनी त्यांना उमेदवारी देवून प्रचारासाठी यंत्रणाही कामाला लावली आहे. सरनाईकांनी प्रभागात आपले चांगलेच वातावरण निर्माण केले आहे. राष्ट्रवादीने गणपत रामचंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाच्या ध्येयधोरणानुसार पाटील यांचा प्रचार आहे. नेहमी सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घेणाऱ्या पाटील यांनी ‘घर टू घर’ असा प्रचार राबवून भागात चांगले वातावरण केले आहे. मालोजीराजेंचे समर्थक अशोक जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. जाधव हे अपक्ष जरी असले तरी प्रभागात त्यांच्या नावाची चर्चा जोरात सुरू आहे. त्यांचा प्रचार जोरात सुरू असल्याने इतरांना त्यांची दखल घ्यावी लागत आहे. येथे पंचरंगी लढत असली तरी मालोजीराजेंची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या निवडणुकीपासून काहीसे अलिप्त असलेले मालोजीराजे आपली ताकद नेमकी कोणाच्या मागे लावणार, त्या उमेदवाराला निवडून येण्याची संधी जास्त आहे.