शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपूरच्या राजकीय सर्जिकलकडे लक्ष

By admin | Updated: November 18, 2016 01:04 IST

पालिकेचे रणांगण : ‘आप्पा’ किंगमेकर ठरणार का?, यड्रावकरांची सावध भूमिका

संदीप बावचे -- जयसिंगपूर  नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची समझोता एक्स्प्रेस यशस्वी झाल्यानंतर शहरात आता राजर्षी शाहू विकास आघाडीविरुद्ध ताराराणी आघाडी पक्ष अशी काट्याची लढत पाहावयास मिळणार आहे. यड्रावकरांना शह देण्यासाठी विरोधकांनी मोट बांधली असून, नगरपालिकेच्या या निवडणुकीत कोण कोणाचे राजकीय सर्जिकल आॅपरेशन करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महादेवराव महाडिक यांनी यड्रावकरांना शह देण्यासाठी महाडिक गटासह स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, भाजप, जनसुराज्य पक्ष व शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांच्याशी वाटाघाटी करून ताराराणी आघाडी पक्षाखाली उमेदवारांची बांधणी केली आहे. विधानपरिषदेला महाडिकांना जयसिंगपुरातून बळ मिळत होते. मात्र, गतवर्षी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत झालेला पराभव महाडिक गटाला जिव्हारी लागल्यामुळे जयसिंगपुरात सत्तांतर हेच टार्गेट कार्यकर्त्यांनी ठेवले आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महाडिक यांनी दोनवेळा शिरोळ तालुक्याचा दौरा केला होता. सा. रे. पाटील गट वगळता त्यांचा हा दौरा यशस्वी झाला. महाआघाडीत नेते एकत्र येऊन कोणत्याही परिस्थितीत पालिकेत सत्तांतर घडविण्याचा चंग आता ताराराणी आघाडी पक्षाने बांधला आहे. येत्या २७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. सध्या प्रचाराचे नारळ फुटले असून, प्रचारसभांच्या तोफाही धडाडणार आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या माध्यमातून शहराचे राजकारण चांगलेच ढवळून निघणार आहे. विरोधी आघाडीची मोट बांधण्यात महाडिक पहिल्या टप्प्यात यशस्वी ठरले असले तरी जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत कोण कोणाचे राजकीय सर्जिकल आॅपरेशन करणार याकडे लक्ष लागले आहे. पुन्हा शाहू आघाडीची मोटशाहू विकास आघाडीच्या माध्यमातून शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या आघाडीची पालिकेत एकतर्फी सत्ता आहे. गेल्या साडेचार वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी आणून एक मॉडेल शहर अशीच शहराची ओळख निर्माण करुन देण्याचा प्रयत्न केला आहे. विरोध ग्रहीत धरून शाहू आघाडीने पुन्हा एकदा यड्रावकर व सा. रे. पाटील गटाची मोट बांधली आहे.विकासाचा मुद्दा चर्चेत ताराराणी आघाडी पक्षाने सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी टीकेची झोड उठवायला सुरू केले आहे. सत्तेच्या जोरावर विकास कामांचा खोटा डांगोरा पिटून जनतेची फसवणूक केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. ताराराणी आघाडीच्या माध्यमातून जयसिंगपूरचा चेहरामोहरा बदलून टाकण्याची ग्वाही देण्यात आली आहे. त्यामुळे जयसिंगपूर पालिकेच्या निवडणुकीत विकासाचा मुद्दा गाजत आहे. शिट्टी कोणाची घुमणारजिल्ह्याच्या राजकारणात माजी आमदार महादेवराव महाडिक यांची खास स्टाईलमधील शिट्टी सर्वांनाच परिचित आहे. बेरजेचे राजकारण साधून महाडिक यांनी जयसिंगपुरात मोट बांधली असली तरी जयसिंगपूर पालिकेच्या निवडणुकीत विरोधकांना शिट्टी चिन्ह मिळाले आहे. यामुळे नेमकी शिट्टी कोणाची घुमणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.