शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पाचगावात इच्छुकांचे आरक्षणाकडे लक्ष

By admin | Updated: September 29, 2016 00:31 IST

जि.प.,पं.स. निवडणूक : पुनर्रचनेमुळे येणार रंगत; पक्षांसह गटांचीही तयारी

ज्योती पाटील-- पाचगाव -पाचगाव जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची लगबग सध्या पाचगाव परिसरात सुरू असून, या तयारीची त्याची चर्चा सध्या गावागावात रंगत आहे. आरक्षणाच्या तारखा जाहीर होताच इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणीला सुरुवातदेखील केली आहे. सध्या आमदार सतेज पाटील गटाचे या मतदारसंघात वर्चस्व असले तरी या निवडणुकीत या ठिकाणी सर्वच पक्षांनी शड्डू ठोकल्याचे सध्या तरी चित्र आहे.दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाचा व जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणारा पाचगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघ आहे. शिवसेनेचे नेतेही या प्रभागात अगोदरपासूनच सत्ता काबीज करण्यासाठी कामाला लागले आहेत. त्यामुळे पाचगाव जि.प. व पं.स. मतदारसंघात राजकारणाची वेगळीच रंगत सध्या पाहावयास मिळत आहे. अनेक मातब्बर उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत; परंतु उमेदवाराचे आरक्षण काय पडते, यावर सर्वांचे भवितव्य अवलंबून आहे. अशातच मतदारसंघामध्ये नवीन गावांचा समावेश झाल्याने अगोदर समाविष्ट असणाऱ्या गावांमध्ये संपर्क व केलेल्या कामाचे कष्ट बहुधा वायाच गेल्याचे चित्र स्पष्ट आहे. सध्याच्या पुनर्रचनेमध्ये समाविष्ट झालेल्या गावांमध्ये छुप्या पद्धतीने इच्छुक उमेदवारांची चाचपणी चालू असून, त्यांनी पक्षाकडेसुद्धा उमेदवारीसाठी वर्णी लागण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. आरक्षण जाहिर होताच इच्छुकांची यादी करता यावी, यासाठी पक्षांनीही आत्तापासूनच कोण इच्छुक आहे, कोणाचा संपर्क कसा आहे, यांचीही कार्यकर्त्यांकरवी चाचपणी सुरूकेली आहे. कोणाला उमेदवारी दिल्यास किती नाराज होतील, त्याचा परिणाम काय होईल, याची चर्चाही पक्षपातळीवर सुरू आहे.दरम्यान, या मतदारसंघाची पुनर्रचना झाल्याने आता या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पाचगाव, मोरेवाडी, कंदलगाव, कळंबा, हणबरवाडी व जैताळ या गावांचा प्रामुख्याने समावेश झाला आहे. तसेच पाचगाव व कळंबा असे दोन पंचायत समिती मतदारसंघ तयार केले आहेत.सतेज पाटील, धनंजय महाडिक यांचेच वर्चस्वया ठिकाणी गटातटाचे राजकारण जास्त प्रमाणात असले तरी आमदार सतेज पाटील व महाडिक यांच्या गटांचे सरासरी वर्चस्व अधिक आहे. सध्या विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी अनेक विकासकामांचा डोंगर रचून आगामी जि.प., पं.स.साठी व्यूहरचना तयार केली आहे. त्यापाठोपाठ दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांनी गावागावांमध्ये विकास करून लोकांना संघटित ठेवण्याचे काम केले आहे.