शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

सीपीआरमधून कैद्याच्या अपहरणाचा प्रयत्न

By admin | Updated: June 16, 2016 01:58 IST

पोलिसांचा थरारक पाठलाग : भिंतीवरून उड्या मारून पळणाऱ्या चौघांना अटक

कोल्हापूर : पुण्यातील मारणे गँगचा शिक्षा भोगत असलेला गुंड सोमप्रशांत मधुकर पाटील (वय ४४, रा. बाणेर, बालेवाडी रोड, पुणे) याला पळवून नेण्याचा प्रयत्न लक्ष्मीपुरी पोलिसांनी हाणून पाडला. पोलिसांनी पाठलाग करून पाटीलसह कोल्हापुरातील त्याच्या चार सहकाऱ्यांना अटक केली. अभिजीत शरद चव्हाण (वय २६, रा. राजारामपुरी), दिग्विजय शिवाजीराव पोवार (वय ३७, रा. सनसिटी, न्यू पॅलेस), संजय दिनेश कदम (वय ५२, रा. राजारामपुरी) व जगदीश प्रभाकर बाबर (वय ४४, रा. सुभाषरोड, मंडलिक वसाहत) अशी त्यांची नावे आहेत. बुधवारी रात्री साडेअकरा वाजता सीपीआर परिसरात घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली. याप्रकाराबाबत लक्ष्मीपुरी पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की पुण्यातील कुप्रसिद्ध मारणे गँगचा गुंड सोमप्रशांत पाटील हा कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याला कोल्हापुरातून पोलिसांच्या तावडीतून पळवून नेण्याची योजना त्यांच्या सहकाऱ्यांनी आखली होती. या योजनेनुसार पाटील याने आजारी पडायचे किंवा आजारी असल्याचा बहाणा करून सीपीआरमध्ये दाखल व्हायचे ठरले होते. त्यानुसार पाटील सीपीआरच्या कैद्यांच्या उपचार कक्षात उपचार घेत होता; परंतु तत्पूर्वीच पाटील याच्या योजनेची लक्ष्मीपुरी पोलिसांना खबऱ्याकडून टिप मिळाली होती. त्यामुळे पोलिस त्याच्या सहकाऱ्यांच्या मागावरच होते. रात्री साडेअकरा वाजता लक्ष्मीपुरी पोलिसांनी सीपीआरच्या कैदी कक्षात छापा टाकला असता सोमप्रशांत पाटील याच्यासह अभिजीत चव्हाण, दिग्विजय पोवार, संजय कदम व जगदीश बाबर हे जेवण व दारू पित होते. पोलिसांना पाहताच त्यांनी तेथील कक्षातून सतरा फूट भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले व अटकेची कारवाई केली. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, पोलिस उपनिरीक्षक युवराज आठरे व त्यांचे सहकारी एस. डी. सावतेकर, अभिजीत घाटगे, विजय देसाई, अजय वाडीकर व अबिद शेख यांनी ही कारवाई केली.मारणे गँगचे कोल्हापूर कनेक्शनमारणे गँगच्या सोमप्रशांत पाटील याला पळवून नेण्याच्या कटात अटक केलेले सर्व संशयित हे कोल्हापुरातील आहेत. मारणे गँगने सुपारी देऊन त्यांच्यावर ही कामगिरी सोपविली होती की, त्याचे अपहरण करण्यामागे अन्य कोणते कारण होते, याचा तपास पोलिस आता करणार आहेत. त्यातून मारणे गँगचे कोल्हापुरचे कनेक्शन उघड होण्याची शक्यता आहे.