शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

जिल्हानिहाय कामांचा आराखडा करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 01:01 IST

कोल्हापूर : उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे कार्यक्षेत्र सतरा जिल्ह्णांचे आहे. या जिल्ह्णांमध्ये आताही विविध कामे सुरू आहेत; म्हणून प्रत्येक जिल्ह्णातील अत्यंत महत्त्वाच्या दोन कामांचा जिल्हानिहाय आराखडा तयार करून ती कामे मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न राहील, अशी ग्वाही या महामंडळाचे नूतन अध्यक्ष व दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश प्रतापसिंह ...

कोल्हापूर : उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे कार्यक्षेत्र सतरा जिल्ह्णांचे आहे. या जिल्ह्णांमध्ये आताही विविध कामे सुरू आहेत; म्हणून प्रत्येक जिल्ह्णातील अत्यंत महत्त्वाच्या दोन कामांचा जिल्हानिहाय आराखडा तयार करून ती कामे मार्गी लावण्याचा माझा प्रयत्न राहील, अशी ग्वाही या महामंडळाचे नूतन अध्यक्ष व दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश प्रतापसिंह जाधव यांनी दिली.महामंडळाचे अध्यक्ष झाल्याबद्दल त्यांनी बुधवारी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. महामंडळाचे काम करताना मला कायमच ‘लोकमत’कडून सहकार्य लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. संपादक वसंत भोसले यांनी या महामंडळाची रचना, उद्देश सांगितला. कोल्हापूरला जाधव यांच्या निमित्ताने या महामंडळावर काम करण्याची प्रथमच संधी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.जाधव म्हणाले, ‘पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठका घेऊन कामाचा आराखडा निश्चित करण्याचा प्रयत्न आहे. त्याच त्याच स्वरूपाची कामे करण्यापेक्षा आरोग्य, शिक्षण, क्रीडा क्षेत्रातील काही वेगळ्या धाटणीची कामे करण्यावर आपला भर राहील. या महामंडळासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याने निधीची अडचण असणार नाही. या महामंडळाचा अध्यक्ष हा जिल्हा नियोजन मंडळाचाही पदसिद्ध सदस्य असतो. त्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकांनाही उपस्थित राहून त्या माध्यमातून विकासकामे मार्गी लावू.’यावेळी ‘लोकमत’मधील सर्व विभागप्रमुख व बातमीदारांसमवेत त्यांनी सुमारे तासभर संवाद साधला.शिरोळमधीलकॅन्सरचे संशोधनशिरोळ तालुक्यात मुख्यत: कीटकनाशकांचा अतिवापर झाल्यामुळे कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. परवाच पर्यावरणमंत्री रामदास कदम यांची भेट घेऊनही सरकारचे लक्ष या गंभीर प्रश्नांकडे वळविले आहे. मुंबईतील टाटा कॅन्सर सेंटरच्या मदतीने या तालुक्यात नव्याने संशोधन करून या प्रश्नाची तीव्रता शास्त्रीय पद्धतीने तपासून पाहण्याचा विचार असल्याचे योगेश जाधव यांनी सांगितले.