शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

आंबेओहळच्या अधिकाऱ्यास जिवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:22 IST

* गुरुवारपासून प्रांतकचेरीसमोर आंदोलन करणार : श्रीपतराव शिंदे उत्तूर : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथे प्रकल्पाचे काम सुरू असताना ...

* गुरुवारपासून प्रांतकचेरीसमोर आंदोलन करणार : श्रीपतराव शिंदे

उत्तूर : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथे प्रकल्पाचे काम सुरू असताना शासकीय कामात अडथळा व जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल आठ धरणग्रस्तांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्मक्लेश आंदोलन सुरू असताना उपविभागीय अभियंता दिनेश विठ्ठल खट्टे यांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गुरव यांनी केला.

अधिक माहिती अशी, आंबेओहळ धरणग्रस्तांचे आत्मक्लेश आंदोलन करण्यासाठी शिवाजी धोंडिबा गुरव, सचिन विष्णू पावले, गणपत केरबा पावले, दिनकर बाळू पावले, शामराव दशरथ पुंडपळ, कल्पक पावले, सुरेश रामचंद्र पावले, राजू गोविंद पावले (रा. आर्दाळ, ता. आजरा) हे धरणस्थळावर गेले होते.

काम बंद करा असे आवाहन धरणग्रस्त करत होते. काम बंद करीत नसल्याने धरणग्रस्त रॉकेल घेऊन स्वत: आत्मदहन करण्यासाठी अंगावर ओतून घेऊन पेटवून घेत होते. यावेळी शिवाजी गुरव यांनी रॉकेलचे कॅन व काड्याची पेटी काढून घेतली.

यावेळी उपअभियंता खट्टे होते. यावेळी रॉकेलचे फवारे खट्टे यांच्या अंगावर गेले, असे धरणग्रस्तांचे म्हणणे आहे.

दरम्यान, खट्टे यांनी आजरा पोलिसांत दिलेल्या वर्दीवरून सचिन पावले, शिवाजी गुरव, गणपत पावले, दिनकर पावले, शामराव पुंडपळ, कल्पक पावले, सुरेश पावले, राजू पावले यांनी संगनमताने प्रकल्पस्थळी येऊन कट रचून अंगावर रॉकेल ओतून जिवे मारण्याचा प्रयत्न केला व २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला. तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद केला.

दरम्यान, चार वाजता पाटबंधारे विभागाने आठजणांवर गुन्हा दाखल केल्याचे कळताच धरणग्रस्त आक्रमक झाले. या घटनेची माहिती मिळताच उत्तूर पोलीस दूरक्षेत्रास माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, पं. स. सदस्य बाळेश नाईक, सदानंद व्हनबट्टे यांनी भेट दिली.

अ‍ॅड. शिंदे म्हणाले, २१ वर्षे धरणाचे काम बंद आहे, आणखी चार दिवस बंद झाले तर काय फरक पडणार आहे. आपण आंबेओहळ प्रकल्पाच्या पुनर्वसनाबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी बोललो असताना काम का सुरू केले. लोकांच्या भावनेचा विचार करावा. घडलेल्या घटनेची वस्तुस्थिती वेगळी दाखवली आहे. घडलेली घटना निंदनीय असून, धरणग्रस्तांच्या चळवळीच्या सर्व संघटना अटकेचा निषेध व पुनर्वसनासाठी प्रांत कार्यालय, गडहिंग्लज येथे आंदोलन करणार आहेत.

यावेळी मुख्य कार्यकारी अभियंता महेश सुर्वे, प्रकल्प अभियंता स्मिता माने, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, तहसीलदार विकास अहिर, पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, मंडल अधिकारी प्रशांत गुरव, आदींसह धरणग्रस्त उपस्थित होते.

----------------------

* वीस वर्षांनंतर अटकसत्र

२००१ मध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल ११३ धरणग्रस्तांना अटक करण्यात आली होती. २० वर्षांनंतर ८ धरणग्रस्तांना सरकारी कामात अडथळा व जिवे मारण्याचे धाडस केल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला. शिवाजी गुरव यांना ताब्यात घेतले असून, अन्य धरणग्रस्तांचा पोलीस शोध घेत आहेत.

* फोटो ओळी : आंबेओहळ प्रकल्प (ता. आजरा) येथे रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न करणारे धरणग्रस्त. दुसऱ्या छायाचित्रात संग्राम संघटनेचे अध्यक्ष कॉ. शिवाजी गुरव यांना ताब्यात घेताना पोलीस निरीक्षक बालाजी भांगे.

क्रमांक : ०७१२२०२०-गड-०२/१२

* उत्तूर (ता. आजरा) येथे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्याशी चर्चा करताना अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, बाळेश नाईक.

क्रमांक : ०७१२२०२०-गड-१३

* धरणग्रस्तांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करणारे उपअभियंता दिनेश खट्टे.

क्रमांक : ०७१२२०२०-गड-०११