शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांच्या विकासासाठी प्रयत्नशील

By admin | Updated: April 16, 2017 00:51 IST

संभाजीराजे : स्वयंम् शाळेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन; वास्तू उभारणीत सहकार्य केलेल्यांचा सत्कार

कोल्हापूर : दिव्यांग मुलांनी स्वावलंबी बनावे यासाठी स्वयंम् शाळेने केलेले कार्य प्रेरणादायी राहील. संस्थेच्या नियोजित उपक्रमास व दिव्यांग मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी शनिवारी दिली. न्यायसंकुलामागे इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे उभारण्यात आलेल्या स्वयंम् शाळेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर संयोगिताराजे छत्रपती, व्हाईस चेअरमन व्ही. बी. पाटील, चेअरमन राजू दोशी, साधना घाटगे, शोभा तावडे उपस्थित होत्या. संभाजीराजे म्हणाले, राज्य शासनाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी डिजिटल क्लासरूम ही राबविण्यात येणार आहे. मात्र सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे दिव्यांगांनाही या तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा यासाठी स्वतंत्र कृती आराखडा राबवावा, अशी मी केंद्र व राज्य शासनाकडे मागणी करणार आहे. वयाच्या १८ व्या वर्षानंतर विशेष मुलांची स्वतंत्र सोय करणे गरजेचे आहे. आपल्या मागणीनुसार शाळेच्या नियोजित इमारतीचा आराखडा पूर्ण करण्यासाठी मी मदत करीन. संयोगिताराजे यांनी शाळेच्या कार्याचे कौतुक केले व या परिवारातील एक सदस्य म्हणून यापुढे कार्यरत राहीन, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविकात राजू दोशी म्हणाले, १९९० साली पाच-सहा मुलांनिशी सुरू झालेल्या या शाळेत आता १२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एक एकर जागेत विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमासाठी मोठा हॉल, स्विमिंग पूल, बगीचा, हॉस्टेल, डे केअर सेंटर उभारण्याचे नियोजन आहे. यासाठी चार कोटींचा निधी लागणार आहे. अमरदीप पाटील म्हणाले, मानवतावादी कार्य करणारी संघटना म्हणून इंडियन रेडक्रॉस संस्थेचा नावलौकिक आहे. देशातील ३५ राज्यांत आणि ७०० हून अधिक जिल्ह्यांत संस्थेच्या शाखा असून कोल्हापुरातील स्वयंम् शाळेत सेरेब्रल पाल्सीसह सर्व प्रकारच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.यावेळी वास्तू उभारणीसाठी सहकार्य केलेले उद्योगपती सचिन मेनन, किरण पाटील, शैलेश देशपांडे, सुमित्र जाधव, पुरुषोत्तम मंत्री, मुबारक शेख, राजशेखर संबर्गी, भरत जाधव, अरुणबाबू गोयंका, गोविंद गुंदेशा, हंजारीमल राठोड, विष्णू बन्सल, राजू दोशी, वाय ए. पाटील, संदीप पोरे, हरीश सेवलाणी, दीप संघवी, जितुभाई शहा यांच्या कुटुंबीयांचा विशेष सत्कार करण्यात आला. शोभा तावडे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अमरदीप पाटील व अ‍ॅड. सुलक्ष्मी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ११ लाखांची देणगी यावेळी उद्योगपती प्रकाश राठोड व महेंद्र राठोड यांनी स्वयंम् शाळेच्या उभारणीसाठी ११ लाख रुपयांची देणगी दिली. युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते सदर रकमेचा धनादेश शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.