शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्ट कार्यालय होण्यासाठी प्रयत्न : मुळे

By admin | Updated: April 2, 2016 00:47 IST

कोल्हापुरात शिबिर : पुणे विभागीय कार्यालयातर्फे ‘पासपोर्ट आपल्या दारी’ कार्यक्रम

कोल्हापूर : कोल्हापुरात यापूर्वी सुरू असलेले पासपोर्ट कार्यालय पूर्ववत सुरू करावे, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. त्याची नोंद आपण घेतली असून, आपल्या पातळीवर यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही कौन्सुलर पासपोर्ट व्हिसा विभागाचे अतिरिक्त सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकारांशी वार्तालापप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे विभागीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी उपस्थित होते.मुळे म्हणाले, प्रशासन लोकाभिमुख झाले असून, ही प्रक्रिया आणखी सुलभ होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अलीकडच्या काळात विदेश मंत्रालय आणि सर्वसामान्य माणसांचा रोज संपर्क होऊ लागला आहे. त्यामुळे पासपोर्टलाही अधिक महत्त्व आले आहे. हा विभाग अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘आयईसी’च्या माध्यमातून गावपातळीवर जाऊन जास्तीत जास्त लोकांना पासपोर्ट देण्याचा प्रयत्न आहे. भारत देश प्रत्येक क्षेत्रात अव्वल असला तरी पासपोर्ट वितरणात अजूनही मागे असल्याचे चित्र आहे. त्यासाठी पासपोर्ट केंद्रांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावा.लोकांना लवकरात लवकर पासपोर्ट मिळावा, यासाठी ‘पासपोर्ट आपल्या दारी’ हा उपक्रम पुणे विभागीय कार्यालयामार्फत राबविला जात आहे. कोल्हापुरात सुरू असलेले शिबिर त्याचाच एक भाग आहे. देशातील ६८० जिल्ह्यात पासपोर्टसाठी आॅनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पोलिस पडताळणीची प्रक्रिया अत्यंत सोपी झाली आहे. पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, आधारकार्ड ही तीन कागदपत्रे असल्यास पासपोर्ट मिळण्यास अडचण नाही. नंतर पडताळणी चालू शकते. देशाच्या आर्थिक विकासाला पासपोर्टचाही मोठा हातभार आहे.कोल्हापुरातील तिसरे शिबिरपासपोर्टसंदर्भात २०१३ व २०१५ मध्ये कोल्हापुरात शिबिर घेण्यात आले होते. आताचे हे तिसरे शिबिर आहे. आणखी दोन महिन्यांनी पाच दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. पासपोर्ट हे आर्थिक सशक्तीकरणाचे माध्यम आहे. पासपोर्ट संदर्भातील अ‍ॅप आहे. तो पोलिसांनी स्वीकारल्यास पडताळणी लवकर होण्यास मदत होईल.