शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

लाल बावट्याचा सरकारवर हल्लाबोल

By admin | Updated: January 20, 2016 01:25 IST

बांधकाम कामगारांच्या मागण्या : जेलभरो आंदोलन; इचलकरंजी, गडहिंग्लज, हातकणंगले, राधानगरी मार्गावर रास्ता रोको

कोल्हापूर : लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेतर्फे बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज, मंगळवारी इचलकरंजी, गडहिंग्लज, हातकणंगले, हळदी येथे जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत रास्ता रोको केला. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली व नंतर सुटका केली. इचलकरंजीत जेलभरो आंदोलनइचलकरंजी : केंद्रात व राज्यात भाजप सरकारची सत्ता येऊन दीड वर्षे झाली, तरी अद्याप महागाई कमी झाली नाही. भरमसाट आश्वासने देऊन सर्वसामान्य जनतेच्या मतांवर निवडून येऊन कोणत्याही आश्वासनाची पूर्तता केली नाही. तसेच रेशनिंग व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे असा आरोप करत लालबावटा संघटनेने रास्ता रोको व जेलभरो आंदोलन केले. याप्रकरणी पोलिसांनी २१३ आंदोलकांना अटक करून सुटका केली.येथील सीटू संलग्न कामगार संघटना, किसान सभा व शेतमजूर युनियन या तीन संघटनांच्यावतीने मंगळवारी दुपारी दोन वाजता लालबावटा कार्यालयापासून मुख्य मार्गाने मोर्चाने येऊन छत्रपती शिवाजी पुतळा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस नसल्याने वाहतुकीचा चांगलाच गोंधळ उडाला. आंदोलकांनी मानवी साखळी करून संपूर्ण चौकाला घेरले. सुमारे अर्धा तास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी आंदोलकांना अटक करून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईखाली अटक करून सोडून दिले.यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून विविध मागण्यांच्याही घोषणा देण्यात आल्या. यामध्ये यंत्रमाग कामगार, घरेलू मोलकरीण, शेतमजूर, अन्नसुरक्षा योजना, फेरीवाला संरक्षण हक्क, बांधकाम कामगार, आदींसह विविध घटकांतील कामगारांच्या मागण्यांचा समावेश आहे. आंदोलनात आनंदराव चव्हाण, दत्ता माने, ए. बी. पाटील, शिवगोंडा खोत, सदा मलाबादे, पार्वती जाधव, महादेवी शिगुनशी, जहिरा शेख आदींसह महिला, पुरुष सहभागी झाले होते. गडहिंग्लजला रास्ता रोकोगडहिंग्लज : येथील दसरा चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी भूमिका मांडताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आंदोलनकर्त्या दहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करून त्यांची सुटका केली.दुपारी १२च्या सुमारास गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील बांधकाम कामगार येथील दसरा चौकात एकत्र जमले. प्रारंभी गडहिंग्लज तालुकाध्यक्ष सर्जेराव मांजरे, आजरा तालुकाध्यक्ष प्रकाश कुंभार, चंदगड तालुकाध्यक्ष परशराम गुरव, विष्णू जाधव (मलिग्रे) व दत्ता कांबळे (आजरा) यांची भाषणे झाली.आंदोलनात सुनील पाटील, रामचंद्र सुतार, जक्काप्पा पाटील, महादेव लोहार, दिनकर सुतार, भावकाना ढवळे, मधू लोहार, दीपक शेट्याळकर, राजेंद्र गावडे, सुनील पाटील, आदींसह कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांचा सहभाग लक्षणीय होता.लाल झेंडे, लाल टोप्या आणि लाल टी-शर्ट परिधान केलेल्या आंदोलकांच्या सरकार विरोधी घोषणाबाजीने दसरा चौक दणाणून गेला. पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, उपनिरीक्षक प्रियंका शेळके व सचिन मद्वाण्णा यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त होता. कोल्हापूर-सांगली रस्ता रोखलाहातकणंगले : हातकणंगले येथील एस. टी. स्टँडसमोर महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लालबावटा)च्या वतीने कॉम्रेड भाऊसाहेब कसबे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन करण्यात आले. हातकणंगले गाव पाच तिकीटपासून मोर्चाला सुरुवात झाली. ६०० ते ७०० आंदोलक एस. टी. स्टँड समोर आले असता आंदोलकांनी कोल्हापूर-सांगली रस्ता रोखून धरला. आंदोलकांनी अचानक रास्ता रोको केल्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन प्रशासकीय इमारतीमध्ये त्यांना स्थानबद्ध केले होते. पोलीस फौजफाटा मोठ्या संख्येने असल्याने आंदोलक शांत झाले. महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या वतीने हातकणंगले तहसीलदार यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. यामध्ये शेतमजुरांसाठी स्वतंत्र कल्याणकारी बोर्ड स्थापन करावे. शेतमजुरांना दिवसाला ३०० रुपये पगार मिळेल, असा किमान वेतन कायदा करावा. शेतमजुरांना रेशनकार्डवर ३५ किलो धान्य व ५ लिटर रॉकेल मिळावे. श्रावण बाळ आणि संजय गांधी निराधार योजनेतील जाचक अटी रद्द करून महिन्याला १५००० रुपये अनुदान द्यावे. भूमिहीन शेतमजुरांची शासकीय गायरानातील अतिक्रमणे नियमित करावीत. पुरवठा अधिकारी यांचा मनमानी कारभार थांबला पाहिजे. यासह इतर मागण्यांचा समावेश होता. या मागण्यांसाठी सरकारी कार्यालये बेमुदत बंद पाडण्याचा इशारा दिला होता. संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे, कॉ. भाऊसाहेब कसबे यांच्यासह अनिल सनदे, वत्सला भोसले, अर्चना वड्ड, संजय टेक, शांताबाई लोहार, मंगळ आवळे, फतू गुराखी, राधाबाई परीट व मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते.कोल्हापूर-राधानगरी मार्गावर आंदोलनसडोली खालसा : हळदी (ता. करवीर) येथे लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्या वतीने विविध मागण्यांबाबत कोल्हापूर-राधानगरी मार्गावर अर्धा तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले.मेडिकल योजना ताबडतोब चालू करा, दिवाळी बोनस ताबडतोब द्या, घरासाठी पाच लाख अनुदान द्या, अशा विविध मागण्यांसाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात करवीर तालुक्यातील आंदोलक उपस्थित होते. आंदोलनाचे नेतृत्व करवीर अध्यक्ष दत्ता गायकवाड, मधुकर कांबळे, अशोक कांबळे, जयसिंग कांबळे, गोविंद वड्डर, तानाजी कदम, नामदेव कांबळे, संभाजी चव्हाण, तानाजी चव्हाण, संजय चव्हाण, शिवाजी पाटील, सर्जेराव कांबळे, भगवान कांबळे यांनी केले. यावेळी आंदोलकांना अटक करून लगेच सोडले. कुठे गेले अच्छे दिन‘अच्छे दिन’च्या वल्गना करून सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने बांधकाम कामगारांचा मेडिक्लेम बंद केला आहे. हातावर पोट असणारा एखादा कामगार बांधकामावरून किंवा बांधकामाची भिंत अंगावर कोसळली, तर त्याच्यावर उपचार कसे करायचे? हेच काय ते अच्छे दिन? असा सवाल करतानाच ‘आमच्या कष्टाचा पैसा आम्हाला द्या’ नाहीतर ‘जिल्हा बंद’ करू, असा इशारा चंदगड तालुका उपाध्यक्ष पांडुरंग मयेकर यांनी आपल्या भाषणातून दिला.कामगारांच्या मागण्या बंद आरोग्य वीमा योजना सुरू करा, दिवाळीला दहा हजार बोनस द्या, घरासाठी पाच लाख अनुदान आणि दहा लाख बिनव्याजी कर्ज द्या, साठी ओलांडलेल्या व ५५ वर्षांवरील नोंदणीकृत कामगारांना एक लाख रुपये सन्मानधन आणि पाच हजार पेन्शन सुरू करा, कल्याणकारी मंडळावर ‘सिटू’चा प्रतिनिधी घ्यावा, नोंदीत मृत कामगारांच्या वारसांना पाच लाख अनुदान द्या, उच्च शिक्षणासाठी अनुदान द्या, अन्नसुरक्षा कायद्याचा लाभ द्या, महिला कामगारांना गरोदरपणात सहा महिने किमान वेतन द्या.