शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

हा हल्ला म्हणजे नियोजनबद्ध कट

By admin | Updated: February 27, 2015 00:17 IST

रितेशकुमार यांची माहिती : थोडा वेळ द्या, गोविंद पानसरे यांच्या हत्येचा छडा लावूच

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ला हा नियोजनबद्ध कट होता; त्यामुळे मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्यात विलंब होत आहे. परंतु, आम्हाला थोडा वेळ द्या; प्रकरणाचा आम्ही नक्कीच छडा लावू, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी गुरुवारी दिली.या हल्ल्याला दहा दिवस झाले तरी मारेकऱ्यांचा शोध लागला नसल्याने पानसरे यांची मुलगी स्मिता सातपुते, स्नुषा मेघा पानसरे, जावई बन्सी सातपुते, दिलीप पवार, नामदेव गावडे, प्रा. उदय नारकर, एस. बी. पाटील, सतीशचंद्र कांबळे, आदींनी ताराबाई पार्कातील पोलीस महानिरीक्षक कार्यालयात रितेशकुमार यांची भेट घेतली.रितेशकुमार म्हणाले, पानसरे यांच्या हल्ल्यावरील तपास योग्य दिशेने आणि वेगवेगळ्या दिशेने सुरू आहे. या हल्ल्यामागील एक जरी पुरावा सापडला, तरी त्याच्या आधारे आम्ही हल्लेखोरांपर्यंत पोहोचू. परिक्षेत्रातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच विविध २५ पथके कसून तपास करत आहेत. आणखी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. जरा वेळ द्या, निश्चितच मारेकऱ्यांना पकडू.डॉ. मनोजकुमार शर्मा म्हणाले, अतिशय थंड डोक्याने व नियोजनबद्धपणे (गहिरी साजिश) हा खून करण्यात आला आहे. यामागे मोठे षड्यंत्र आहे. आम्ही तपासात कुठे कमी पडणार नाही, तुम्ही आम्हाला सहकार्य करा. स्मिता सातपुते म्हणाल्या, ‘हा तपास गतीने व्हावा यासाठी आम्ही भेट घेतली आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या तपासासारखा या तपासामध्येही खंड पडू नये. पुन्हा कुणी दाभोलकर, पानसरे होऊ नये ही यामागची भूमिका आहे. नामदेव गावडे यांनी, पानसरे यांच्या हल्ल्यामागे मोठ्या शक्तींचा हात असण्याची शक्यता वर्तविली.यावेळी संभाजीराव जगदाळे, बाबासाहेब देवकर, आदींनी मते व्यक्त केली. यावेळी भरत पाटील, प्रा. आशा कुकडे, सुशीला यादव, एस. बी. पाटील, सुशांत बोरगे, सुभाष वाणी, हसन देसाई, अ‍ॅड. शिवाजी परुळेकर, आदी उपस्थित होते.कारणांबाबत गैरसमजमेघा पानसरे म्हणाल्या, ‘पानसरे यांचा खून कौटुंबिक वादातून झाला आहे, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. तसे असेल तर पोलिसांनी ते जाहीर करावे. पानसरे यांच्या खुनाबाबत समाजात चुकीचा समज पसरत आहे, याबद्दल आम्ही नाराज आहोत, असे बन्सी सातपुते यांनी सांगितले.गुन्हेगारच देतील माहिती...पानसरे हल्ल्याची माहिती देणाऱ्यास राज्य शासनाने २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. ही रक्कम मोठी असल्याने गुन्हेगारी टोळीतील लोकांतूनच हल्ल्यासंबंधीची माहिती दिली जाईल, असे शर्मा यांनी यावेळी सांगितले.उमातार्इंच्या प्रकृतीत सुधारणाकोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमाताई पानसरे यांच्या प्रकृतीत दिवसेंदिवस चांगली सुधारणा होत आहे. पानसरे यांच्या मृत्यूची बातमी अजूनही त्यांना सांगण्यात आलेली नाही. त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू असल्याचे त्यांना सांगण्यात येत आहे. ही माहिती अन्य कोणत्याही मार्गाने त्यांना समजू नये, यासाठी रुग्णालयाकडूनही काळजी घेतली जात आहे. तर्कावर आधारित..पानसरे हल्ल्याप्रकरणी काही वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होत असलेल्या बातम्या तर्कावर आधारित आहेत. त्याच्याशी पोलिसांचा काही संबंध नसल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी स्पष्ट केले.