शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यावर हल्ला करून मोपेडसह रोकड लंपास

By admin | Updated: September 15, 2015 01:33 IST

शाहूपुरीतील घटना : लूटमारीमुळे पोलिसांची तारांबळ

कोल्हापूर : दुकान बंद करून मोपेडवरून घरी जाणाऱ्या व्यापाऱ्यावर दोघा लुटारूंनी हल्ला करून मोपेडसह रोख ५० हजार रुपये लंपास केले. शाहूपुरी लॉ कॉलेज परिसरात घडलेल्या या लूटमारीमुळे पोलिसांची तारांबळ उडाली. अजित सोहनलाल कोठारी (वय ४५, रा. रुक्मिणीनगर) असे जखमी व्यापाऱ्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, अजित कोठारी यांचे लक्ष्मीपुरी ते बिंदू चौक रस्त्याला लागून इलेक्ट्रॉनिकचे दुकान आहे. सोमवारी रात्री दहाच्या सुमारास दुकान बंद करून ते मोपेडवरून घरी निघाले होते. शहाजी लॉ कॉलेजपासून काही अंतरावर गेले असता दोघा अनोळखी तरुणांनी त्यांना अडवून त्यांच्या डोक्यात लोखंडी गजाने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांची मोपेड घेऊन ते पसार झाले. मोपेडच्या डिकीमध्ये ५० हजार रुपये होते. गंभीर जखमी अवस्थेत कोठारी यांनी रस्त्यावरील नागरिकांना मदतीसाठी हाक दिली. नागरिकांनी या प्रकाराची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. त्यानंतर तत्काळ घटनास्थळी शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्यासह कर्मचारी दाखल झाले. तोपर्यंत जखमी कोठारी यांना नातेवाईकांनी कदमवाडी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी रुग्णालयात जावून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अचानक घडलेल्या प्रकाराने ते बिथरून गेले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान, या लुटारूंच्या शोधासाठी शहरातील सर्व पोलिसांना नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. शहरातील सर्व चौकांत नाकाबंदी करण्यात आली परंतु लुटारूंचा माग लागला नाही. या घटनेमुळे पोलीसही चक्रावले आहेत. (प्रतिनिधी)