शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
3
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
6
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
7
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
8
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
9
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
10
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
11
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
12
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
13
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
14
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
15
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
16
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
17
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
18
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
19
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
20
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी

हल्ल्याचा तपास पाच स्तरांवर सुरू

By admin | Updated: February 21, 2015 02:09 IST

अध्यक्षांकडे चौकशी : कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयासह वादग्रस्त प्लॉटची पाहणी

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावरील खुनी हल्ल्याची व्याप्ती वाढली असून पोलिसांची तपास यंत्रणा ही सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, वैयक्तिक आणि आर्थिक या पाच स्तरावर रात्रंदिवस काम करीत आहे. पोलिसांच्या एका विशेष पथकाने शुक्रवारी सकाळी बिंदू चौकातील कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयासह संस्थेच्या क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील दोन गुंठे प्लॉटची पाहणी केली. या प्लॉटवरून एका झोपडपट्टी संघटनेच्या अध्यक्षाबरोबर पानसरे यांचा यापूर्वी वाद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने त्यांनी प्लॉटच्या पाहणीसह संघटनेचा एक ज्येष्ठ नेता व झोपडपट्टी अध्यक्षांकडे चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. पानसरे यांच्यावरील हल्ल्यापासून कोल्हापूर पोलिसांची झोपच उडाली आहे. रात्रंदिवस पोलिसांची वीस पथके तपास यंत्रणेत गुंतली असून प्रत्येक विषयावर ते चौफेर तपास करीत आहेत. ‘हल्ल्यामागचे कारण’ शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, वैयक्तिक आणि आर्थिक या तीन स्तरांवर सर्व पातळ्यांवर माहिती घेण्याचे काम करीत आहे. तथापि, यासंदर्भात पोलिसांनी कोणतीही माहिती उघड केलेली नाही. याबाबत गोपनीयता पाळण्यात आली आहे. पानसरे यांच्या जवळचे नातेवाईक, मित्र, कार्यकर्त्यांकडे चौकशी करत असताना अनेक प्रश्न समोर येत आहेत. त्या प्रत्येक प्रश्नांवर पोलीस कसोशीने काम करत आहेत. चौकशीमध्ये दिल्या जाणाऱ्या माहितीची खातरजमाही केली जात आहे. मारेकऱ्यांचे रेखाचित्र तयार केल्याने त्या वर्णनाच्या सराईत गुन्हेगारांना पोलीस ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत. (प्रतिनिधी) आरोपींच्या शोधासाठी पथक शहराबाहेरपोलिसांच्या एका विशेष पथकाने सकाळी बिंदू चौकातील कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयासह संस्थेच्या क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील दोन गुंठे प्लॉटची पाहणी केली. या प्लॉटवरून एका झोपडपट्टी संघटनेच्या अध्यक्षाबरोबर पानसरे यांचा यापूर्वी वाद झाल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने त्यांनी ही पाहणी केल्याचे समजते. यावेळी संघटनेच्या एका ज्येष्ठ नेत्यासह झोपडपट्टी अध्यक्षाकडे चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, विविध पथके वेगवेगळ्या स्तरांवर काम करत असून रात्री उशिरा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक शहराबाहेर आरोपींच्या शोधासाठी गेले होते.मोटारसायकलीबाबत गोपनीयता पानसरे दाम्पत्यावरील हल्ल्याचा तपास करत असताना शहरात महत्त्वाच्या ठिकाणी तीन मोटारसायकली बेवारस स्थितीत मिळाल्या आहेत. हल्लेखोरांनी काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल वापरल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे. पोलिसांना सापडलेल्या मोटारसायकलींमध्ये एक पल्सरही आहे. हल्ल्यामध्ये तिच वापरण्यात आली होती का ? याबाबत मात्र गोपनीयता पाळली आहे.